विद्यार्थ्यांना ‘कुशल’ बनवा

By admin | Published: September 6, 2015 02:53 AM2015-09-06T02:53:04+5:302015-09-06T02:53:04+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने शनिवारी शिक्षकदिन समारंभ साजरा करण्यात आला.

Make the students 'skilled' | विद्यार्थ्यांना ‘कुशल’ बनवा

विद्यार्थ्यांना ‘कुशल’ बनवा

Next

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने शनिवारी शिक्षकदिन समारंभ साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे होते. अतिथी म्हणून राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी व संशोधन संस्थेचे (नीरी) संचालक डॉ. सतीश वटे, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले व कुलसचिव पूरण मेश्राम उपस्थित होते. विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील गुरू नानक सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट प्राचार्य, शिक्षक व लेखक यांना पुरस्कार प्रदान करू न शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
पालकमंत्री बावनकुळे पुढे म्हणाले, शिक्षण हे राष्ट्रीय कार्य आहे; शिवाय शिक्षकांचे देशाच्या प्रगतीत भरीव योगदान राहिले आहे. समाज हा शिक्षकाकडे सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व म्हणून पाहतो. तसेच शिक्षकसुद्धा एक आदर्श विद्यार्थी व नागरिक घडविण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालतो. पुढील दहा वर्षे भारतासाठी फार महत्त्वाचे राहणार आहेत. या काळात भारतीय तरुणांना अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र त्यासाठी येथील तरुणांनी स्वत:ला तयार केले पाहिजे, असेही ते म्हणाले. डॉ. वटे यांनी ‘निसर्ग’ हा सर्वांत चांगला शिक्षक असल्याचे सांगितले. निसर्ग हा नि:स्वार्थपणे मनुष्याला सर्व गोष्टी शिकवीत असल्याचे ते म्हणाले. डॉ. काणे यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यादानाच्या प्रक्रियेत व्यापारीकरण व राजकारण येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. कोमल ठाकरे यांनी केले तर विद्यापीठाचे कुलसचिव पूरण मेश्राम यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Make the students 'skilled'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.