सायबर गुन्हेगाराने कस्टमर केअरच्या नावाखाली बँक खात्यातील साडेचार लाख उडवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2021 01:11 PM2021-12-19T13:11:35+5:302021-12-19T13:20:51+5:30

इंटरनेट बँकिंगच्या समस्येसाठी कस्टमर केअरला फोन करणे एकाला चांगलेच महागात पडले. नकली कस्टमर केअर कर्मचाऱ्याने ग्राहकाला तब्बल साडेचार लाखांनी लुटले.

man calls banking customer care and loses 4.5 lakhs | सायबर गुन्हेगाराने कस्टमर केअरच्या नावाखाली बँक खात्यातील साडेचार लाख उडवले

सायबर गुन्हेगाराने कस्टमर केअरच्या नावाखाली बँक खात्यातील साडेचार लाख उडवले

Next

नागपूर : इंटरनेट बँकिंगमध्ये अडचण आल्याने त्याने कस्टमर केअरला कॉल लावला. परंतु, हा कॉल त्याला चांगलाच महागात पडला. कस्पटमर केअर कर्मचारी असल्याचे सांगून आरोपीने ग्राहकाला तब्बल चाडेचार लाखांचा चुना लावल्याचे समोर आले आहे.

यशोधरानगरातील व्यक्तीच्या बँक खात्यातून सायबर गुन्हेगाराने चक्क साडेचार लाख रुपये उडविले. ३ डिसेंबरला घडलेल्या या घटनेची तक्रार अमितकुमार विष्णुदेव प्रसाद (वय ३९) यांनी शुक्रवारी पोलिसांकडे नोंदवली.

प्रसाद यांच्या तक्रारीनुसार, ते भिलगावच्या गोकुलनगरीत राहतात. ३ डिसेंबरला दुपारी १ ते ३ च्या दरम्यान त्यांचे स्टेट बँकेचे योनो ॲप काम करत नसल्याने त्यांनी इंटरनेटवर कस्टमर केअरचा नंबर धोधून त्यावर संपर्क साधला. यावेळी फोन अटेंड करणाऱ्या एका भामट्याने प्रसाद यांना एक लिंक पाठवली. ती लिंक ओपन करून त्यात प्रसाद यांनी आपल्या बँक खात्याची माहिती पाठवली असता सायबर गुन्हेगाराने प्रसाद यांच्या बँक खात्यातील साडेचार लाखांची रोकड काढून घेतली.

ही फसवणूक लक्षात आल्यानंतर प्रसाद यांनी यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे. 

दरम्यान, सायबर गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आपली वैयक्तिक माहिती, बँकिंग डिटेल्स, पासवर्ड कुणाशीही शेअर करू नये, फोनवर बँक किंवा अमुक तमुक अधिकारी बोलत असून माहिती मागत असल्यास ते देऊ नये सतर्कता बळगावी, असे आवाहन पोलिांकडून करण्यात आले आहे.

Web Title: man calls banking customer care and loses 4.5 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.