लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी एटीएम फोडण्याचा 'प्लॅन', मशीन फोडायला सुरुवात केली तितक्यात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2022 05:05 PM2022-03-25T17:05:05+5:302022-03-25T17:35:56+5:30

त्याने तीन वर्षांपूर्वी त्याच्या लग्नासाठी मित्राकडून एक लाख रुपयाचे कर्ज घेतले हाेते. ही रक्कम मिळण्यासाठी मित्राने त्याच्याकडे तगादा लावला हाेता. ही रक्कम परत करण्यासाठी त्याने एटीएम फाेडण्याचा निर्णय घेतला.

man caught red handed attempting to break the atm | लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी एटीएम फोडण्याचा 'प्लॅन', मशीन फोडायला सुरुवात केली तितक्यात..

लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी एटीएम फोडण्याचा 'प्लॅन', मशीन फोडायला सुरुवात केली तितक्यात..

Next
ठळक मुद्देआवाज झाला अन् 'प्लॅन' फसला

लाेकमत न्यूज नेटवर्क

बुटीबोरी (नागपूर) : लग्नासाठी मित्राकडून घेतलेले एक लाख रुपयाचे कर्ज परत करण्यासाठी चाेरट्याने चक्क एटीएम मशीन फाेडण्याचा व त्यातील रक्कम चाेरून नेण्याचा उपद्व्याप केला. मशीन फाेडण्यासाठी त्याने लाेखंडी सब्बलचा वापर केला. मात्र, ताे पाेलिसांच्या जाळ्यात अडकला. ही घटना एमआयडीसी बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बुटीबाेरी औद्याेगिक वसाहतीत बुधवारी (दि. २३) मध्यरात्री २.३० ते ३ वाजताच्या दरम्यान घडली.

राणू राजू मडकामे (वय २५, रा. वॉर्ड क्रमांक-५, गडचिरोली) असे अटक करण्यात आलेल्या चाेरट्याचे नाव आहे. ताे मागील काही दिवसांपासून डोंगरगाव, जिल्हा नागपूर येथे राहताे. त्याने तीन वर्षांपूर्वी त्याच्या लग्नासाठी मित्राकडून एक लाख रुपयाचे कर्ज घेतले हाेते. ही रक्कम मिळण्यासाठी मित्राने त्याच्याकडे तगादा लावला हाेता. ही रक्कम परत करण्यासाठी त्याने एटीएम फाेडण्याचा निर्णय घेतला.

ठरल्याप्रमाणे ताे मध्यरात्री परिसरात कुणीही नसल्याचे पाहून इंडाेरामा गेट क्रमांक-१ समाेर असलेल्या एचडीएफसी बॅंकेच्या एटीएम रूममध्ये शिरला. त्याने आधी रुमचे शटर बंद केले आणि सब्बलच्या मदतीने मशीन फाेडायला सुरुवात केली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून राणूला ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून ३० हजार रुपयांची एमएच-४०/सीएफ-८३२२ क्रमांकाची माेटारसायकल आणि ५०० रुपयांची सब्बल असे एकूण ३० हजार ५०० रुपयांचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी एमआयडीसी बुटीबाेरी पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास शैलेंद्र नागरे करीत आहेत. ही कारवाई पाेलीस नायक प्रफुल्ल राठोड, स्वप्निल ठाकरे, अशोक सिडाम, वाहन चालक मिश्रा यांच्या पथकाने केली.

यू ट्यूबवरून घेतली माहिती

मित्राला परत देण्यासाठी एवढी माेठी रक्कम आणायची कुठून, याच विचारात राणू हाेता. त्यातच त्याने यू ट्यूबवर एटीएम असे फाेडायचे याच्या काही व्हिडिओ क्लिप बघितल्या. त्यानंतर त्याने एमआयडीसी परिसरातील सुरक्षा रक्षक नसलेल्या एटीएमचा शाेेध घेतला. त्याने मशीन फाेडण्याचा प्रयत्न केला खरा, पण शेवटी पाेलिसांच्या हाती सापडला.

आवाजामुळे डाव फसला

राणूने सब्बलच्या मदतीने मशीन फाेडायला सुरुवात करताच परिसरातून जाणाऱ्या व्यक्तीला आवाज आला. त्याला संशय आल्याने त्याने लगेच एमआयडीसी बुटीबाेरी पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. शटर बंद असल्याने पाेलीस आल्याची माहिती राणूला मिळाली नाही.

Web Title: man caught red handed attempting to break the atm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.