नरभक्षी वाघिण अवनीला नागपुरात दिला अग्नी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 10:17 PM2018-11-03T22:17:33+5:302018-11-03T22:51:31+5:30

यवतमाळ येथील पांढरकवड्यातील टी-१ नरभक्षी वाघिण अवनी हिला गोळी घातल्यानंतर शनिवारी नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात आले. यापूर्वी मृत वाघिणीला पोस्टमार्टेमसाठी सकाळी गोरेवाडा येथील वन्यजीव बचाव केंद्रात आणण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणा(एनटीसीए)च्या नियमानुसार तिचे पोस्टमार्टेम करून येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.

The man eater tigress Avani gave fire in Nagpur | नरभक्षी वाघिण अवनीला नागपुरात दिला अग्नी

नरभक्षी वाघिण अवनीला नागपुरात दिला अग्नी

Next
ठळक मुद्देगोरेवाड्यात अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यवतमाळ येथील पांढरकवड्यातील टी-१ नरभक्षी वाघिण अवनी हिला गोळी घातल्यानंतर शनिवारी नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात आले. यापूर्वी मृत वाघिणीला पोस्टमार्टेमसाठी सकाळी गोरेवाडा येथील वन्यजीव बचाव केंद्रात आणण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणा(एनटीसीए)च्या नियमानुसार तिचे पोस्टमार्टेम करून येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.
यासाठी विशेषत्वाने अधिकाऱ्यांची एक चमू गठित करण्यात आली होती. या चमूमध्ये वनीकरण प्रदेशाचे क्षेत्रीय व्यवस्थापक जे.पी. त्रिपाठी, एनटीसीएचे प्रतिनिधी हेमंत कामडी, डब्ल्यूसीटी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी मिलिंद परिवक्कम, वन्यजीव पशुचिकित्सक डॉ. अजय पोहरकर, डॉ. शिरीष उपाध्ये, डॉ. पी.एम. सोनकुसळे व डॉ. बी.एम. कडू सहभागी होते. या चमूसमोरच शनिवारी दुपारी २ ते ५ वाजेदरम्यान वाघिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

छातीवर लागली होती गोळी
वाघिणीच्या मागच्या डाव्या पायात बेशुद्ध करणाऱ्या औषधाचे इंजेक्शन (ट्रॅक्लायजिंग डार्ट) आढळून आले. यासोबतच तिच्या छातीच्या डाव्या बाजूला बंदुकीच्या गोळीची जखम आढळून आली. पोस्टमार्टेमदरम्यान परीक्षणासाठी वाघिणीच्या शरीरातून काही नमुने घेण्यात आले. प्राथमिक तपासात असे आढळून आले की, वाघिणीचा मृत्यू हृदय व श्वसनक्रिया बंद झाल्याने आणि रक्त वाहिल्यामुळे झाला आहे. ही कारवाई पेंच टायगर रिझर्व्हचे संचालक रविकिरण गोवेकर आणि गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक नंदकिशोर काळे यांच्यासमोर करण्यात आली.

 

Web Title: The man eater tigress Avani gave fire in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.