बापाने पोटच्या मुलीला संपवलं, आत्महत्येचा केला बनाव; नागपुरातील धक्कादायक घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2022 12:04 PM2022-11-14T12:04:25+5:302022-11-14T12:08:02+5:30

याआधी मुलीने केला होता आत्महत्येचा प्रयत्न

Man gets daughter to pen suicide note naming kin, then kills her; Shocking incident in Nagpur | बापाने पोटच्या मुलीला संपवलं, आत्महत्येचा केला बनाव; नागपुरातील धक्कादायक घटना

बापाने पोटच्या मुलीला संपवलं, आत्महत्येचा केला बनाव; नागपुरातील धक्कादायक घटना

googlenewsNext

नागपूर : क्राइम सिरीअल पाहून अल्पवयीन मुलीची हत्या करून आत्महत्या केल्याचा बनाव करणाऱ्या बापाकडून पोलिसांच्या चौकशीत सहकार्य करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. गुड्डू रजकच्या अल्पवयीन मुलीने घटनेच्या महिन्याभरापूर्वी त्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. जर ती बाब गंभीरतेने घेण्यात आली असती तर तिचा जीव वाचला असता, असे निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.

कळमना येथील रहिवासी असलेल्या गुड्डू रजक याने आपली १६ वर्षांची मुलगी माहीला (बदललेले नाव) ६ नोव्हेंबर रोजी फाशी देण्याचे नाटक केले. माहीला स्टूलवर उभं केलं आणि तिच्या गळ्यात फास घातला. धाकट्या मुलीकडून तिचा फोटो काढून घेतल्यानंतर स्टूलला ढकलून दिले आणि त्यामुळे माहीला गळफास लागला व तिचा जीव गेला. माहीने १० ऑक्टोबर रोजी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

चौकशीत तिने सावत्र आई कौसल्या पिपरडे, भाऊ संतोष, वहिनी कल्पना आणि वडिलांच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले होते. त्यानंतर चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेमुळे माहीच्या जिवाला धोका असल्याचे स्पष्ट झाले होते, मात्र त्याला फारसे गंभीरतेने घेण्यात आले नाही. अखेर वडिलांच्या षड्यंत्राला बळी पडून त्याला आपला जीव गमवावा लागला.

हा प्रकार नेमका का केला याचे कारण देण्यास आरोपी टाळाटाळ करतो आहे. तो मनोरुग्ण असल्याचाही पोलिसांना संशय आहे. दुसऱ्या पत्नीला आणि तिच्या कुटुंबीयांना धडा शिकवण्यासाठी मुलीची हत्या केल्याच्या चर्चेवर विश्वास बसत नाही. त्याला न्यायालयात हजर केले असता १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Web Title: Man gets daughter to pen suicide note naming kin, then kills her; Shocking incident in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.