मनपाला मिळाला मुहूर्त

By admin | Published: June 22, 2015 02:38 AM2015-06-22T02:38:11+5:302015-06-22T02:38:11+5:30

स्थानिक संस्था कर (एलबीटी) यापासून अपेक्षित उत्पन्न न झाल्याने महापालिकेच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.

The man got the Muhurta | मनपाला मिळाला मुहूर्त

मनपाला मिळाला मुहूर्त

Next

नागपूर : स्थानिक संस्था कर (एलबीटी) यापासून अपेक्षित उत्पन्न न झाल्याने महापालिकेच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. याचा विकास कामावरही परिणाम झाला आहे. कर्मचाऱ्यांना दरमहिन्याला वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. एलबीटीला पर्याय दिला जाईल वा राज्य सरकारकडून ठोस अनुदान मिळेल अशी अपेक्षा होती. यामुळे अर्थसंक ल्पाचा मुहूर्त निघत नव्हता. अखेर मनपाचा सन २०१५-१६ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे आज सोमवारी विशेष सभेत सादर करणार आहे.
जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपची महापालिकेत सत्ता असल्याने विकासासोबत मूलभूत सुविधा उपलब्ध होईल, करात सवलत मिळेल अशी लोकांना अपेक्षा आहे. परंतु आयुक्तांनी उत्पन्नाचे स्रोत विचारात घेता १२९४.६७ क ोटीचा अर्थसंकल्प दिला आहे. स्थायी समितीकडून यात २०० ते २५० कोटींची वाढ होण्याची अपेक्षा आहे. एलबीटी आॅगस्ट महिन्यापासून रद्द होणार असल्याने पुढील वर्षातही या विभागाकडून ५०० ते ६०० कोटीचे उत्पन्न अपेक्षित आहे. मालमत्ता करापासून आयुक्तांना ३०० ते ३५० कोटी, पाणी दरापासून १५० कोटी, नगररचना विभागाकडून १२५ क ोटी तर इतर मार्गाने ४५० क ोटीच्या आसपास उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शासनाकडून दरमहा ठोस अनुदान प्राप्त झाल्याशिवाय आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता कमीच आहे.
प्रस्तावित अर्थसंकल्पात कर्मचाऱ्यांचे वेतन व्यय ३०७ कोटी, प्रशासकीय खर्च २४ क ोटी, सेवानिवृत्ती वेतन ९५ कोटी, सुस्थिती व दुरुस्तीवर २०९ कोटी, भांडवली खर्च ८०० कोटी व इतर बाबीवरील खर्च ५६ क ोटीच्या आसपास गृहीत धरण्यात आला आहे. मालमत्ता करात नुकतीच वाढ करण्यात आली आहे. पाणीकर व इतर करात वाढ होण्याची शक्यता असल्याने तूर्त नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The man got the Muhurta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.