माणूस एक अन् धर्म दोन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 11:03 AM2020-03-05T11:03:31+5:302020-03-05T11:03:59+5:30

अशातच ‘माणूस एक अन् धर्म दोन’ अशी न्यारी किमया उमरेड (जि. नागपूर) नगर पालिकेत उजेडात आली आहे.

Man one but religion two! | माणूस एक अन् धर्म दोन!

माणूस एक अन् धर्म दोन!

Next
ठळक मुद्दे कर्मचाऱ्याच्या सेवापुस्तिकेत नोंद

अभय लांजेवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: सध्या देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीच्या मुद्यावर वादंग सुरू आहे. मी हिंदू, तू मुसलमान, तो अमुक आणि तो तमुक यावर रान पेटले आहे. अशातच ‘माणूस एक अन् धर्म दोन’ अशी न्यारी किमया उमरेड (जि. नागपूर) नगर पालिकेत उजेडात आली आहे. चक्क कर्मचाऱ्याच्या सेवापुस्तिकेतच ही अफलातून नोंद १५ वर्षानंतर आढळून आली. करीम मन्सुर बेग असे या पालिका कर्मचाऱ्याचे नाव आहे. मजूर म्हणून रुजू झालेले करीम बेग सध्या पालिकेत दीनदयाल अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत कर्तव्यावर आहेत. करीम बेग इयत्ता तिसरा वर्ग उत्तीर्ण आहेत.
उमरेड पालिकेतील कार्यरत कर्मचारी करीम बेग यांची सेवापुस्तिका २००५ ला तयार करण्यात आली. या सेवापुस्तिकेत अन्य महत्त्वपूर्ण बाबींसह धर्म, जात असा रकाना आहे. त्या रकान्यासमोर मुसलमान (हिंदू) असे नमूद करण्यात आले आहे. शाळेच्या सर्टिफिकेट वरून नोंद घेण्यात आली, अशीही नोंद या सेवापुस्तिकेत नमूद आहे. ही बाब ‘लोकमत’च्या लक्षात येताच मुख्याधिकारी राजेश भगत यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे याबाबतच विचारणा केली असता, ही बाब खरी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या नोंदीमुळे करीम बेग यांना कोणतीही अडचण आली नाही. असे असले तरी त्यावेळेतील या नोंदीची तपासणी का झाली नाही, असाही प्रश्न यानिमीत्ताने निर्माण होत आहे. ‘तू हिंदु बनेंगा, ना मुसलमान बनेगा...इंसान की औलाद है इंसान बनेगा’ १९५९ ला ‘धुल का फुल’ या चित्रपटातील हे गीत आजच्या व्यवस्थेला आणि उद्भवलेल्या परिस्थितीला साजेसं असंच आहे. करीम बेग यांच्या प्रकरणात या ओळी अगदी तंतोतंत साजेशा असल्या तरी त्याच्या अडचणी वाढविणाऱ्या ठरू नयेत एवढेच !

ज्यावेळी ही सेवापुस्तिका तयार करण्यात आली, त्यावेळेस कार्यरत असलेल्या आस्थापना लिपिकाची ही चूक आहे. सध्या करीम बेग हे पालिकेत कर्तव्यावर आहेत. त्यांना याबाबत माहिती नाही. शिवाय त्यांना अद्याप कोणतीही अडचण आलेली नाही. मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी, अन्य महत्त्वपूर्ण कामांसाठी सेवापुस्तिकेतील पहिल्या पानाची नोंद अत्यावश्यक ठरत असते, ही वस्तुस्थिती आहे. त्यावेळी पहिल्यांदाच ही चूक लक्षात यावयास हवी होती.
राजेश भगत
मुख्याधिकारी, नगर परिषद, उमरेड

Web Title: Man one but religion two!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार