धमकी देणाऱ्याची पोलिसांत तक्रार करायला जाणाऱ्यावर चाकूने वार

By योगेश पांडे | Published: May 25, 2023 05:38 PM2023-05-25T17:38:15+5:302023-05-25T17:39:34+5:30

गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

man stabbed with a knife for went to report the threat to the police | धमकी देणाऱ्याची पोलिसांत तक्रार करायला जाणाऱ्यावर चाकूने वार

धमकी देणाऱ्याची पोलिसांत तक्रार करायला जाणाऱ्यावर चाकूने वार

googlenewsNext

नागपूर : आपल्या मामेभावाच्या पत्नीला जीवे मारण्याची तक्रार देणाऱ्या इसमाची पोलिसांत तक्रार करायला जाणाऱ्या तरुणावर एका आरोपीने चाकूने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

सय्यद जावेद अली उर्फ जाफर अली (३१, लोधीपुरा) यांना बुधवारी मध्यरात्री शेख अजहर शेख मजहर (२६, लोधीपुरा) हा भेटला आणि तू चोरीचे मोबाईल विकतोस व त्यातील एक मोबाईल मला दे, असा आग्रह करू लागला. मी असे काम करत नाही असे म्हणत सय्यदने त्याला हटकले. यावरून शेख अजहर संतापला व त्याने रात्री सय्यदच्या घरी जाऊन शिवीगाळ करत त्याच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्याने सय्यदलादेखील शिवीगाळ केली.

ही घटना सय्यदच्या नातेवाईकांना समजली व ते त्यांच्याकडे आले. त्यांचा मामेभाऊ आवेज खान उर्फ अहमद खान (२८, गांधीबाग) हा तेथे आला व तो शेखविरोधात तक्रार देण्यासाठी पोलिसांत तक्रार देण्याच्या तयारीत होता. ही बाब शेखला कळली व त्याने आवेजला गाठले. काही कळायच्या आतच त्याच्या मानेवर चाकूने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्याला मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले. सय्यदच्या तक्रारीवरून शेखविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Web Title: man stabbed with a knife for went to report the threat to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.