मेयो रुग्णालयात बुरखा घालून फिरत होता पुरुष; सुरक्षा रक्षकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले
By सुमेध वाघमार | Published: June 14, 2023 07:18 PM2023-06-14T19:18:16+5:302023-06-14T19:18:34+5:30
या प्रकरणाने रुग्णालयात खळबळ उडाली असून या मागे त्याचा काय उद्देश होता, याचा तपास पोलीस करीत आहे.
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान बुरखा व त्यावर अॅप्रॉन घालून फिरणाºया एका पुरुषाला सुरक्षा रक्षकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. मागील १५ दिवसांपासून तो या वेषात फिरत होता. या प्रकरणाने रुग्णालयात खळबळ उडाली असून या मागे त्याचा काय उद्देश होता, याचा तपास पोलीस करीत आहे.
माहितीनुसार, मेयोच्या सर्जिकल कॉम्प्लेक्सचा मुख्य प्रवेशद्वारावर कर्तव्यावर असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाचा (एमएसएफ) जवानाला बुरखा व त्यावर अॅप्रान घातलेला महिलेवर संशय आल्याने थांबविले. रुग्णालयाचा आयकार्डची विचारणा केली. ती उत्तर देत नसल्याचे पाहता महिला सुरक्षा रक्षकांना बोलविण्यात आले. तिला बोलते करण्याचा प्रयत्न करीत असताना तिने बाईचा आवाज काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे संशय आणखी बळावला. तिचा बुरखा काढला असता आत दाडी-मिशी असलेला तरुण होता. नावाची विचारणा केल्यावर त्याने आपले नाव जावेद सांगितले. असो का करतो, असे विचारल्यावर त्याने स्वत:ला तृतीय पंथी असल्याचे सांगितले. पुरुषांमध्ये आवड असल्याने रुग्णालयात मागील १५दिवसांपासून फिरत असल्याचे तो म्हणाला. सुरक्षा रक्षकांनी त्याला तहसील पोलिसांच्या हवाली केले.