पोलिसांना जखमी करणाऱ्याला सहा महिने कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:11 AM2021-08-20T04:11:14+5:302021-08-20T04:11:14+5:30
नागपूर : कर्तव्यावरील पोलिसांना गंभीर जखमी करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने सहा महिने कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश सुनील पाटील ...
नागपूर : कर्तव्यावरील पोलिसांना गंभीर जखमी करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने सहा महिने कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश सुनील पाटील यांनी हा निर्णय दिला.
अमरिंदरसिंग बाबूसिंग (रा. लष्करीबाग) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून, तो लष्करीबाग येथील रहिवासी आहे. प्रकरणातील अन्य तीन आरोपी उत्तमसिंग महेंद्रसिंग (रा. हरयाणा), जसवीरसिंग हरदीपसिंग (रा. पंजाब) व गुरुदीपसिंग महेंद्रसिंग (रा. लष्करीबाग) यांना ठोस पुराव्यांअभावी निर्दाेष मुक्त करण्यात आले. ही घटना १२ जानेवारी २०१५ रोजी मध्यरात्रीनंतर घडली होती. अमरिंदरसिंगने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून पोलीस वाहनास धडक दिली. त्यामुळे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले.
--------------
अमरिंदरसिंगची शिक्षा
१ - कलम ३३२ अंतर्गत ६ महिने कारावास व ५००० रुपये दंड
२ - कलम ३५३ अंतर्गत ५ महिने कारावास व १००० रुपये दंड
३- कलम ४२७ अंतर्गत ३ महिने कारावास व ५००० रुपये दंड
४ - कलम २७९ अंतर्गत २ महिने कारावास व १००० रुपये दंड
५ - कलम ३३७ अंतर्गत २ महिने कारावास व १००० रुपये दंड