मनपाचा अर्थसंकल्प २ हजार कोटींच्या वर!
By admin | Published: February 24, 2016 03:27 AM2016-02-24T03:27:57+5:302016-02-24T03:27:57+5:30
पुढील वर्षात महापालिके ची निवडणूक आहे. विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढविली जाणार असल्याने निवडणुकीपूर्वी
३१ मार्चपूर्वी सादर होणार : सरकारी अनुदानाचा मोठा वाटा
नागपूर : पुढील वर्षात महापालिके ची निवडणूक आहे. विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढविली जाणार असल्याने निवडणुकीपूर्वी प्रभागातील विकास कामे करता यावीत यासाठी २०१६-१७ या वर्षाचा महापालिकेचा अर्थसंकल्प ३१ मार्चपूर्वी सादर करण्याचा सत्तापक्षाचा मानस आहे. निवडणूक वर्ष असल्याने अर्थसंकल्प २००० कोटींचा टप्पा ओलांडणार असल्याचे संकेत सत्तापक्षातील नेत्यांनी दिले आहे.
५ मार्चला स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंनर बंडू राऊ त यांना अर्थसंकल्पाची तयारी करावी लागणार आहे. विद्यमान स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी महापालिकेचा सन २०१५-१६ या वर्षाचा १९६५.१२ कोटीचा अर्थसंकल्प मांडला होता. परंतु एलबीटी रद्द करण्यात आल्याने गेल्या वर्षात महापालिकेला बिकट आंिर्थक परिस्थितीला सामोरे जावे लागले. याचा विकास कामांवरही परिणाम झाला. परंतु आता एलबीटीच्या अनुदानात राज्य सरकारने वाढ केली आहे. मालमत्ता व नगर रचना विभागाच्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात वाढ अपेक्षित असल्याने त्यामुळे पुढील वर्षाचा अर्थसंकल्प २००० कोटींहून अधिक राहणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे.
एलबीटीच्या मोबदल्यात पुढील वर्षात सरकारकडून ६०० कोटींचे अनुदान अपेक्षित आहे. गेल्या वर्षी ४५० कोटींचे अनुदान गृहित धरण्यात आले होते, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानात वाढ अपेक्षित आहे. तसेच मागील काही वर्षांचा विचार करता दरवर्षीच्या अर्थसंकल्पात १५० ते २५० कोटींनी वाढ झालेली आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या १९६५ कोटींच्या अर्थसंकल्पात १०० ते १५० कोटींची वाढ करण्यात येईल, असे संकेत सत्तापक्षाने दिले आहे.
प्रस्तावित कामे नगरसेवक ांना पूर्ण करता यावीत यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यावर भर दिला जाणार आहे. यात प्रामुख्याने मूलभूत सुविधांचा समावेश राहणार आहे. (प्रतिनिधी)