कर्नाटकला जाणाऱ्या प्रवाशांना `आरटीपीसीआर`ची सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:08 AM2021-08-01T04:08:02+5:302021-08-01T04:08:02+5:30
नागपूर : कोरोनामुळे मागील सव्वा वर्षापासून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर काही दिवसांपासून रेल्वेगाड्यात प्रवाशांची ...
नागपूर : कोरोनामुळे मागील सव्वा वर्षापासून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर काही दिवसांपासून रेल्वेगाड्यात प्रवाशांची संख्या वाढली आहे. परंतु आता पुन्हा केरळ आणि महाराष्ट्रात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने रेल्वे प्रवाशांसाठी नवा आदेश जारी केला आहे. त्यानुसार महाराष्ट्र आणि केरळमधील रेल्वे प्रवाशांना कर्नाटकला जायचे असल्यास त्यांनी कोरोनाची लस घेतली की नाही याची माहिती आणि सोबत आरटीपीसीआर टेस्टचा निगेटिव्ह अहवाल सोबत न्यावा लागणार आहे. हा अहवाल ७२ तासांपेक्षा आधीचा नसायला हवा. कर्नाटक सरकारने रेल्वे प्रशासनाला कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांकडे आरटीपीसीआर टेस्टचा निगेटिव्ह अहवाल आहे की नाही याची खात्री करण्यास सांगितले आहे. कर्नाटक सरकारचा हा आदेश महाराष्ट्र आणि केरळमधून रेल्वे, बस, विमान आणि खासगी वाहनाने कर्नाटकला जाणाऱ्या नागरिकांसाठी जारी करण्यात आला आहे.
................