मांढळ बाजार समिती सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:09 AM2021-05-10T04:09:46+5:302021-05-10T04:09:46+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : काेराेना संक्रमणामुळे राज्य शासनाच्या आदेशान्वये मांढळ (ता. कुही) कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतीमाल खरेदी-विक्री ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : काेराेना संक्रमणामुळे राज्य शासनाच्या आदेशान्वये मांढळ (ता. कुही) कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतीमाल खरेदी-विक्री व्यवहार बंद करण्यात आले हाेते. बाजार समिती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने तीन आठवड्यानंतर बाजार समितीतील खरेदी-विक्री पुन्हा सुरू हाेणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यातील काेराेना संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाने लाॅकडाऊनची घाेषणा केली आणि इतर बाजार समित्यांसाेबतच मांढळ बाजार समिती ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या काळात बाजार समितीच्या यार्डातील धान्य, वाळलेली मिरची व बैलबाजार बंद ठेवण्यात आले हाेते. शेतीमाल व गुरे खरेदी-विक्री बंद ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांची माेठी अडचण झाली हाेती.
दरम्यान, बाजार समिती प्रशासनाने मागील आठवड्यात बाजार समितीतील सर्व व्यवहार सुरू करण्याचा निर्णय ३ मे राेजी घेतला. त्याअनुषंगाने ४ मेपासून बाजार सुरू करण्यात आला. मात्र, बाजारामुळे काेराेना संक्रमण वाढण्याची शक्यता व्यक्त करीत मांढळ ग्रामपंचायत प्रशासनाने यावर आक्षेप नाेंदवित मिरची बाजार सुरू करण्यास मनाई केली. त्यांनी तसे तहसीलदार व पाेलीस निरीक्षक यांना पत्रही दिले. ही समस्या साेडविण्यासाठी बाजार समितीच्या संचालक मंडळाने सरपंच व पाेलीस निरीक्षकांशी यावर विस्तृत सकारात्मक चर्चा केली. त्यामुळे हा बाजार रविवार (दि. ९) पासून सुरू करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनीषा फेंडर, बाजार समितीचे सभापती मनोज तितरमारे, हरिष कढव, सरपंच शाहू कुलसंगे, मोहन मते, पोलीस उपनिरीक्षक अनिल देरकर, प्रदीप कुलरकर, राजेश तिवस्कर, भागेश्वर फेंडर, सचिव अंकुश झंझाळ, आशिष आवळे, प्रदीप धनरे, खेमराज तितरमारे, गुणाकार सेलोकर, उदाराम फेंडर, विनोद ठवकर, नरेश चौधरी, शंकी अरोरा उपस्थित होते.
...
ऐनवेळी तिढा
बाजारात रविवारी खरेदी-विक्री व्यवहाराला सुरुवात हाेताच पाेलीस बाजारात दाखल झाले. त्यामुळे बाजार पुन्हा बंद हाेण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे सभापती मनाेज तितरमारे यांनी पुन्हा संबंधितांशी संपर्क साधून चर्चा केली. त्यावर बाजार भरवणे किंवा बंद ठेवणे याबाबत आपण कुणाकडे तक्रार अथवा सूचना केली नाही, अशी माहिती सरपंच शाहू कुलसंगे यांनी दिली. शेतकऱ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेता हा बाजार सुरू करण्यात आल्याचे मनाेज तितरमारे यांनी सर्वांना पटवून देत उपाययाेजनांचे काटेकाेर पालन केले जाणार असल्याचे आश्वासन दिल्याने ऐनवेळी निर्माण झालेला तिढा सुटला.