होळीपूर्वी मनपाला धक्का

By admin | Published: March 23, 2016 03:00 AM2016-03-23T03:00:27+5:302016-03-23T03:00:27+5:30

राज्य सरकारने एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या मोबदल्यात राज्यातील महापालिक ांना अनुदान देण्याचा

Manipala push before Holi | होळीपूर्वी मनपाला धक्का

होळीपूर्वी मनपाला धक्का

Next

नागपूर : राज्य सरकारने एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या मोबदल्यात राज्यातील महापालिक ांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नागपूर महापालिके ला दर महिन्याला ४९.२९ कोटींचे अनुदान मिळत होते. परंतु यात ३.२९ कोटींनी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा अध्यादेश काढून राज्य सरकारने होळीपूर्वी महापालिकेला जबर धक्का दिला आहे.
महापालिका प्रशासनाला या संदर्भात अद्याप निर्देश प्राप्त झालेले नाही. परंतु होळीपूर्वी हा निर्णय घेतल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. आॅगस्ट २०१५ मध्ये सरकारने एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
या मोबदल्यात महापालिकांना अनुदान देण्याची घोषणा केली होती. महापालिकेला दर महिन्याला ३०.९९ कोटींचे अनुदान मिळत होते. परंतु मिळणारे अनुदान कमी असल्याने महापालिकेच्या आर्थिक अडचणी वाढल्या होत्या. पदाधिकारी व प्रशासनाने शासनाला माहिती दिली होती.
निधी वाढवण्याची वेळोवेळी मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने आढावा घेऊ न अनुदानासंदर्भात सुधारित निर्णय घेतला होता. यात अनेक महापालिक ांच्या अनुदानात कपात करण्यात आली होती. परंतु नागपूर महापालिकेला ४९.२९ कोटींचे अनुदान मिळत होते. यामुळे मोठा दिलासा मिळाला होता. विकास कामांसाठी निधी उपलब्ध झाला होता. (प्रतिनिधी)

कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा
प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला राज्य सरकारकडून महापालिकेच्या खात्यात एलबीटी अनुदान जमा केले जाते. परंतु यावेळी २२ तारीख झाली तरी अद्याप ही रक्कम जमा झालेली नाही. २४ मार्चला होळी आहे. त्यानंतर २५ मार्चला गुडफ्रायडे, नंतर चौथा शनिवार व रविवार असल्याने चार दिवस बँका बंद राहणार आहे. महापालिकेच्या काही विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. परंतु बहुसंख्य विभागातील कर्मचाऱ्यांना अद्याप फेब्रुवारी महिन्याचे वेतन मिळालेले नाही. त्यामुळे होळी कशी साजरी करावी, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

Web Title: Manipala push before Holi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.