मानकापूर क्रीडा संकुलाचा होणार मेकओव्हर, ६८३ कोटींचा विकास आराखडा तयार

By जितेंद्र ढवळे | Published: January 29, 2024 08:01 PM2024-01-29T20:01:55+5:302024-01-29T20:02:06+5:30

क्लब हाऊस अन् शॉपींग कॉम्प्लेक्स

Mankapur sports complex will get a makeover, development plan of 683 crores is ready | मानकापूर क्रीडा संकुलाचा होणार मेकओव्हर, ६८३ कोटींचा विकास आराखडा तयार

मानकापूर क्रीडा संकुलाचा होणार मेकओव्हर, ६८३ कोटींचा विकास आराखडा तयार

नागपूर: मानकापूर क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा तसेच वाणिज्यीक सुविधा उभारणीच्या मुळ कामाकरिता ४७३ कोटी रुपये व विमा, जीसटी व इतर सेवा शुल्क मिळून एकूण ६८३ कोटी रुपयांचा आराखडा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने अंतिम करण्यात आला आहे. हा प्रस्ताव प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्धतेसाठी शासनाकडे सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केल्या.

विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, क्रीडा प्रशिक्षक विजय मुनिश्वर पियुष अंबुलकर आदी याप्रसंगी उपस्थित होते.

नागपूर येथे ऑलम्पीक व एशीयन क्रीडा स्पर्धांच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्यावत क्रीडा संकुल उभारण्याच्या कामाला गती मिळण्यासाठी निधी उपलब्धतेनुसार क्रीडा सुविधेची कामे प्राधान्याने करण्याचे व इतर कामे टप्प्याटप्याने पूर्ण करण्याचे आयुक्त बिदरी यांनी आराखड्याचा आढावा घेताना सांगितले. तर जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सर्व कामे आंतरराष्ट्रीय मानकानुसार समाविष्ठ करण्याच्या सूचना दिल्या.

काय आहे अंतिम आरखड्यात?
अंतिम आराखड्यानुसार क्रीडा सुविधांचे बळकटीकरण, स्पोर्ट्स क्लब, स्पोर्ट्स सायन्स सेंन्टर, साहसी क्रीडा प्रकारासाठी सुविधा, अद्यावत फुटबॉल स्टेडियम, हॉकी ॲस्ट्रोटर्फ, अद्यावत ॲथलेटीक्स स्टेडीयम, टेनिस कोर्ट्स, मल्टीजीम, स्पोर्ट्स एज्युकेशन ॲण्ड इनफॉरमेशन सेंटर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर, ऑलम्पिक साइज जलतरण तलाव, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, कुस्ती, आर्चरी, शुटींग, फेंन्सींग, स्क्वाश, बॉक्सींग, जुडो, कराटे, तायक्वांडो, टेबल टेनिस, बास्केटबॉल, सॉफ्टबॉल, हॅन्डबॉल, क्रीकेट व आवश्यकतेनुसार इतर खेळांच्या सुविधा, तसेच एकूण १२०० खेळाडूंकरिता निवास व्यवस्था, ७०० वाहनांकरिता पार्कींग व त्यावर सोलर विद्युत प्रणाली उभारण्यात येणार आहे.

क्लब हाऊस अन् शॉपींग कॉम्प्लेक्स
क्रीडा सुविधा व सदर संकुल उभारणी नंतर त्याचा व्यवस्थापनाचा खर्च भागवण्यासाठी वापरा व हस्तातर तत्वार क्लब हाऊस, शॉपींग कॉम्प्लेक्स, तारांकीत हॉटेल, स्पोर्टस् क्लब आदी वाणिज्यीक प्रकल्प उभारण्याचा देखील आराखड्यात समावेश आहे.

Web Title: Mankapur sports complex will get a makeover, development plan of 683 crores is ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर