महिलेसोबत छेडछाड करणा-यावर विनयभंगाचा गुन्हा

By admin | Published: June 29, 2017 03:32 PM2017-06-29T15:32:05+5:302017-06-29T15:32:05+5:30

28 वर्षांच्या विवाहित महिलेसोबत तुटलेल्या मैत्रीचे धागे जुळविण्याच्या प्रयत्नात हिरोगिरी करणा-या एका आरोपीचा अजनी पोलीस शोध घेत आहेत.

Mankibhanga's offense is a crime against woman | महिलेसोबत छेडछाड करणा-यावर विनयभंगाचा गुन्हा

महिलेसोबत छेडछाड करणा-यावर विनयभंगाचा गुन्हा

Next

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 29 - 28 वर्षांच्या विवाहित महिलेसोबत तुटलेल्या मैत्रीचे धागे जुळविण्याच्या प्रयत्नात हिरोगिरी करणा-या एका आरोपीचा अजनी पोलीस शोध घेत आहेत. तुषार अनिल पांडे (वय २७) असे आरोपीचे नाव आहे. तो हुडकेश्वरमधील सूमन स्कूलजवळ राहतो. त्याची पीडित महिलेसोबत अनेक दिवसांपासून मैत्री होती.

तिच्या लग्नानंतर या दोघांमधील मैत्री संपुष्टात आली. काही दिवसांनंतर समोरासमोर येताच आरोपी पांडेने तिला पुन्हा फोन करणे, मेसेज पाठविणे सुरू केले. पुन्हा त्यांच्यात विसंवाद झाला. त्यामुळे तिने पांडेचे फोन उचलणे बंद केले. परिणामी संतप्त झालेल्या आरोपी पांडेने सोमवारी सकाळी ती आपल्या दुचाकीने कामावर जात असताना तिचा कारने पाठलाग केला.

अजनी ठाण्याच्या हद्दीत तिच्या दुचाकीसमोर सिनेस्टाईल कार आडवी केली आणि तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले. महिलेने ही बाब आपल्या कुटुंबीयांना सांगितली. गप्प बसल्यास त्याचा त्रास वाढेल, याची कल्पना आल्यामुळे तिने बुधवारी अजनी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक बी. आर. जाधव यांनी विनयभंग तसेच धमकी देण्याच्या आरोपाखाली आरोपी पांडेविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी फरार असून, पोलीस त्याचाच शोध घेत आहेत.

Web Title: Mankibhanga's offense is a crime against woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.