मनोहर तल्हार यांचे निधन, साठोत्तरी मराठी साहित्यातील 'मनोहर' पर्व संपले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 06:08 PM2018-02-15T18:08:12+5:302018-02-15T18:09:07+5:30
साठोत्तरी मराठी साहित्यात आपल्या कथा, कवितांनी एक वेगळी ओळख निर्माण करणारे मनोहर तल्हार यांचे गुरुवारी नागपुरात निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. सुरेश भट, उद्धव शेळके, मधुकर केचे, राम शेवाळकर यांचे ते समकालीन होते.
Next
नागपूर - साठोत्तरी मराठी साहित्यात आपल्या कथा, कवितांनी एक वेगळी ओळख निर्माण करणारे मनोहर तल्हार यांचे गुरुवारी नागपुरात निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. सुरेश भट, उद्धव शेळके, मधुकर केचे, राम शेवाळकर यांचे ते समकालीन होते. त्यांच्या अप्रिय अफलातून, अशरिरी, शुक्रथेम्ब या कादंबऱ्या, तोलरेघ, निःसंग हे कथा संग्रह आणि श्वेतांबरी हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.