पुरावरून मनपा-नासुप्र जुंपली

By admin | Published: June 24, 2015 03:05 AM2015-06-24T03:05:27+5:302015-06-24T03:05:27+5:30

सोमवारी मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती.

Manpa-Nasup Jumpli on the flood | पुरावरून मनपा-नासुप्र जुंपली

पुरावरून मनपा-नासुप्र जुंपली

Next

एकमेकांवर खापर : अनधिकृत ले-आऊ टमध्ये पाणी तुंबले
नागपूर : सोमवारी मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. २४ तासानंतरही दक्षिण व उत्तर-पूर्व नागपुरातील काही भागात पाणी तुंबले आहे.
शहरालगतच्या भागात पावसाचे पाणी वाहून जाणारी यंत्रणा नसल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. शहरातील काही प्रमुख वस्त्यातही पाणी शिरले होते. याला मनपा प्रशासन जबाबदार असल्याचे नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे अनधिकृत ले-आऊ टमध्ये नियोजनबद्ध विकास न झाल्याने याला नासुप्र जबाबदार असल्याचा दावा मनपाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पुराच्या मुद्यावरून मनपा व नासुप्र यांच्यात चांगलीच जुंपली आहे.
नदी, नाल्याच्या काठावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे बेसा, बेलतरोडी, पिपळा फाटा, हुडकेश्वर आदी भागातील परिस्थिती गंभीर बनली आहे. उत्तर नागपुरातील नारी-नारा, यशोधरानगर, राणी दुर्गावतीनगर, इंदोरा, वनदेवीनगर, पूर्व नागपुरातील विजयनगर, भरतवाडा, पावनगाव, गुलमोहरनगर, पुनापूर व पारडी आदी भागात पाणी तुंबले होते. विजयनगर भागात गडरलाईन नसल्याची माहिती स्थानिक रहिवासी विजय शाहू यांनी दिली.
नारी भागात अनधिकृत बांधकामामुळे पाणी तुंबण्याच्या घटना वाढत आहेत. बेसा-बेलतरोडी भागात उंच इमारती उभारण्यात आल्या आहेत. परंतु पाण्याचा निचरा होणारी यंत्रणा नाही. रस्ते व पावसाळी नाल्या नसल्याचे विजय देशपांडे म्हणाले.(प्रतिनिधी)

Web Title: Manpa-Nasup Jumpli on the flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.