मनपा घोटाळा, उत्तरासाठी शेवटची संधी
By admin | Published: April 17, 2015 02:19 AM2015-04-17T02:19:46+5:302015-04-17T02:19:46+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिकेला कोट्यवधीच्या घोटाळ्याप्रकरणी उत्तर सादर करण्यासाठी
हायकोर्ट : ‘कॅग’नुसार कंत्राटदारांना दिली अधिक रक्कम
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिकेला कोट्यवधीच्या घोटाळ्याप्रकरणी उत्तर सादर करण्यासाठी शेवटची संधी म्हणून २४ एप्रिलपर्यंत वेळ दिला आहे.
यासंदर्भात मुकेश शाहू यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. ‘कॅग’च्या अहवालानुसार २००१ ते २०११ या १० वर्षांच्या काळात महानगरपालिकेने कंत्राटदारांना अधिक रक्कम दिली. यावर ‘कॅग’ने मनपाला स्पष्टीकरण मागितले होते. मनपाने उत्तर दिले, पण ते ‘कॅग’ने अमान्य केले. या घोटाळ्यात तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष, सदस्य, मनपा आयुक्त व अधिकाऱ्यांचा समावेश. यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती, पण काहीच कारवाई करण्यात आली नाही. प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)