सिंधी भाषा स्पर्धेत मानसी अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:09 AM2021-03-10T04:09:01+5:302021-03-10T04:09:01+5:30
नागपूर : मातृभाषा प्रचार समितीच्या वतीने राष्ट्रस्तरीय सिंधी भाषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात नागपूरच्या मानसी टहिल्यानी हिने ...
नागपूर : मातृभाषा प्रचार समितीच्या वतीने राष्ट्रस्तरीय सिंधी भाषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात नागपूरच्या मानसी टहिल्यानी हिने प्रथम पुरस्कार पटकाविला आहे. दुसरा पुरस्कार उल्हासनगर येथील रिद्धी शर्मा तर तृतीय पुरस्कार नागपूरच्या जान्हवी सचदेव हिने पटकाविला आहे. स्पर्धेत देव होतचंदानी, सुमती साधवानी, भाविका होतचंदानी, कशिश रोहडा, विराज सुनील रोहडा, पराग कटारिया, नयन राकेश मोटवानी, स्वाती राजपाल, निशिता बुधवानी, हर्ष सचदेव, भावेश सचदेव यांना प्रोत्साहन पुरस्कार प्राप्त झाल्याची घोषणा राजेश स्वामनानी व मातृभाषा प्रचार समितीचे अध्यक्ष हासानंद सतपाल यांनी केली. प्राचार्य चित्रा दौलतानी यांच्या हस्ते १५ मार्च रोजी या पुरस्कारांचे वितरण केले जाईल.
---------
सच्चो सतरामदास सेवा मिशनद्वारे आरोग्य शिबिर
नागपूर : जरीपटका येथील सच्चो सतरामदास सेवा मिशनच्या वतीने हुडकेश्वर रोड येथील शिवमंदिरात नि:शुल्क आरोग्य व लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात डॉ. राम थारवानी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक दादा घनश्यामदास कुकरेजा, के.के. दर्शन, पंकज लोणारे, भावना, संतोष लोणारे, वेद आर्य, विजया, महिंद्रा, महन थदानी, पूजा मोरयानी, लक्ष्मी बोरकर उपस्थित होते. शिबिरात २८७ रुग्णांनी लाभ घेतला.
.........