कोविडयोद्धा डॉक्टरांचा ‘डॉक्टर्स डे’निमित्त मनपातर्फे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:07 AM2021-07-02T04:07:19+5:302021-07-02T04:07:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपूर महापालिका आणि शासकीय रुग्णालयांसोबत खांद्याला खांदा लावून खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनीही ...

Manvapat felicitates Kovidyodha Doctor on the occasion of 'Doctor's Day' | कोविडयोद्धा डॉक्टरांचा ‘डॉक्टर्स डे’निमित्त मनपातर्फे सत्कार

कोविडयोद्धा डॉक्टरांचा ‘डॉक्टर्स डे’निमित्त मनपातर्फे सत्कार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपूर महापालिका आणि शासकीय रुग्णालयांसोबत खांद्याला खांदा लावून खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनीही या शहरातील नागरिकांचे प्राण वाचविण्यात मोलाची भूमिका पार पाडली. डॉक्टर्स डेनिमित्त गुरुवारी मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहात आयोजित कार्यक्रमात मनपातर्फे डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.

शहरातील सर्वच डॉक्टर देवदूत ठरले. या डॉक्टरांच्या भरवशावरच आता कितीही मोठी लाट आली तरी त्याचा सामना करण्यासाठी नागपूरकर सज्ज असल्याचे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी याप्रसंगी केले. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.,अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर उपस्थित होते.

आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी भावनिक मार्गदर्शन करीत वैद्यकीय क्षेत्रातील सर्व डॉक्टर्स आणि कोविडकाळात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सेवा देणाऱ्या प्रत्येक योद्ध्यांचे कौतुक करीत मनपा प्रशासनाच्या वतीने आभार मानले. कोरोनाकाळात नागपूर शहराने केलेले कार्य हे देशातील कुठल्याही शहरापेक्षा उत्तम राहिले. टीम वर्क असल्यामुळे आपण या महामारीला नियंत्रण करू शकलो, असे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी डॉ. अजय केवलिया, डॉ. अशोक अरबट, डॉ. हरदास, डॉ. क्रिष्णा खैरनार यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित सर्व डॉक्टरांचा महापौर व आयुक्त यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी केले. संचालन डॉ. टिकेश बिसेन यांनी केले.

...असे आहेत सत्कारमूर्ती डॉक्टर्स

मेयोचे सेवानिवृत्त अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. गोवर्धन नवखरे, साथरोग नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, डॉ. गजेंद्र महल्ले, डॉ. अशोक अरबट, डॉ. अनुप मरार, डॉ. रवींद्र खडसे, डॉ. स्वाती भिसे, निरीचे डॉ. क्रिष्णा खैरनार, डॉ. नंदकिशोर खराडे, डॉ. अजय हरदास, डॉ. अमोल दौंकलवार, डॉ. निर्भय कुमार, डॉ. मेघा जैतवार, डॉ. आतिक खान, डॉ. वर्षा देवस्थळे, डॉ. साजिया, डॉ. टिकेश बिसेन, डॉ. ख्वाजा, डॉ. दीपांकर भिवगडे, डॉ. सुनील कांबळे, डॉ. अश्विनी निकम, डॉ. रणवीर यादव, डॉ. मयूर, डॉ. वसुंधरा भोयर, संजय देवस्थळे आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Web Title: Manvapat felicitates Kovidyodha Doctor on the occasion of 'Doctor's Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.