गुरुवारी १४,३६७ लोकांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:09 AM2021-04-09T04:09:40+5:302021-04-09T04:09:40+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरातील १४,३६७ लाेकांनी गुरुवारी कोरोना लस घेतली. १३,१५० लोकांनी पहिला, ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरातील १४,३६७ लाेकांनी गुरुवारी कोरोना लस घेतली. १३,१५० लोकांनी पहिला, तर १२५० जणांनी घेतला दुसरा डोस घेतला आहे.
नागपूर शहरात १६ जानेवारीपासून आरोग्य सेवक, २ फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्करला कोरोना लस दिली जात आहे. १ मार्चपासून ६० वर्षे वयावरील तर ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्यांना लस दिली जात आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व लोकांना लस देण्याचे आदेश जारी करण्यात आले. सध्या दररोज १३ ते १४ हजार लोकांना लस दिली जात आहे.
नागपूर शहरातील लसीकरण (८ एप्रिल)
पहिला डोस
आरोग्य सेवक - २६६
फ्रंटलाईन वर्कर - १३८
४५ वर्षांवरील - ७,०३४
४५ वर्षांवरील आजारी - १७२०
६० वर्षांवरील - ३,९१९
एकूण - १३,१५०
...
दुसरा डोस
आरोग्य सेवक - ११८
फ्रंटलाईन वर्कर - १८३
४५ वर्षांवरील - ७२
४५ वर्षांवरील आजारी - ३५४
६० वर्षांवरील - ४८०
एकूण - १२५०