नागपुरात तब्बल ५१ परिसर सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 12:53 AM2020-07-29T00:53:22+5:302020-07-29T00:54:45+5:30

शहरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने चिंता वाढली आहे. यासोबतच दिवसेंदिवस प्रतिबंधित क्षेत्रांची भर पडत आहे. मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळून आल्याने मंगळवारी तब्बल ५१ परिसर सील करण्यात आले.

As many as 51 areas have been sealed in Nagpur | नागपुरात तब्बल ५१ परिसर सील

नागपुरात तब्बल ५१ परिसर सील

Next
ठळक मुद्देकोरोनाबाधितांची संख्या वाढल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने चिंता वाढली आहे. यासोबतच दिवसेंदिवस प्रतिबंधित क्षेत्रांची भर पडत आहे. मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळून आल्याने मंगळवारी तब्बल ५१ परिसर सील करण्यात आले. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतचे आदेश जारी केले.
नव्या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लक्ष्मीनगर झोन क्षेत्रातील साईसंगम अपार्टमेंट, कृष्णालीला अपार्टमेंट, फागो ले- आऊट राजेंद्रनगर, साईबाबानगर, पॅराडाईज सोसायटी सोनेगाव, काँग्रेसनगर, मरियमनगर, नागभूमी ले-आउट, इंद्रप्रस्थनगर हिंदुस्तान कॉलनी, फकिरा वाडी आदी वस्त्यांचा समावेश आहे.
धरमपेठ झोनमधील टेकडी रोड सीताबर्डी, शुभ लक्ष्मी निवास अपार्टमेंट, चमेडिया वस्ती, शंकरनगर भूखंड क्रमांक १५९, शिवाजीनगर भूखंड क्रमांक १९३, फ्रेंड्स कॉलनी, नरेंद्रनगर झोन क्षेत्रातील निर्मलनगरी, धंतोली झोन क्षेत्रातील रजत संकुल एसटी स्टँड रोड, पार्वतीनगर, मंगळवारी झोन क्षेत्रातील प्रशांत कॉलनी,गोरेवाडा रोड,नेहरूनगर, पेन्शननगर, हनुमाननगर झोन क्षेत्रातील तुकडोजीनगर एलआयजी कॉलनी, बजाज चौक, गजानननगर, प्रोसेस सर्वेअर न्यू नरसाळा, चंदननगर राम मंदिर जवळ, शिवाजी सोसायटी न्यू म्हाळगीनगर, सतरंजीपुरा झोनमधील ठक्कर ग्राम, पाचपावली, नंदगिरी रोड, पाठराबे मोहल्ला, हामिम अपार्टमेंट, धरमपेठमधील तेलीपुरा इलेक्ट्रॉनिक मार्केट, आशीनगरमधील बडी मशीद टेका नाका, देवनगर, पवननगर, सिद्धार्थनगर, टेका नाका, सती दुर्गावती चौक, गुरुद्वारा मागचा भाग आदी वस्त्यांचा यात समावेश आहे.

Web Title: As many as 51 areas have been sealed in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.