नागपूर शहरातील अनेक हॉटेल व ढाब्यांवर दारूची सर्रास विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:26 AM2018-11-13T00:26:04+5:302018-11-13T00:27:14+5:30
काचीपुराच्या धर्तीवर शहरातील अनेक हॉटेल आणि ढाब्यांवर ग्राहकांना सर्रासपणे दारू उपलब्ध केली जात आहे. पोलिसांच्या संगनमतानेच हा सर्व प्रकार सुरू आहे. यावर लगेच नियंत्रण न आणल्यास अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान काचीपुरा येथे झालेल्या कारवाईचा तपास केला असता सचिन नावाच्या कर्मचाऱ्याच्या इशाऱ्यावर येथील ढाबे व हॉटेलला संरक्षण देण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काचीपुराच्या धर्तीवर शहरातील अनेक हॉटेल आणि ढाब्यांवर ग्राहकांना सर्रासपणे दारू उपलब्ध केली जात आहे. पोलिसांच्या संगनमतानेच हा सर्व प्रकार सुरू आहे. यावर लगेच नियंत्रण न आणल्यास अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान काचीपुरा येथे झालेल्या कारवाईचा तपास केला असता सचिन नावाच्या कर्मचाऱ्याच्या इशाऱ्यावर येथील ढाबे व हॉटेलला संरक्षण देण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे.
पाचपावली, लकडगंज, कळमना, सक्करदरा, बेलतरोडी, सोनेगाव, हुडकेश्वर, नंदनवन, यशोधरा, कामठी, वाडी, बजाजनगर आदी पोलीस ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणावर हॉटेल आणि ढाबे आहेत. येथे दारूचे सेवन करण्यास अधिक खर्च पडत नाही. त्यामुळे येथे ग्राहकांची गर्दी असते. अनेकदा गुन्हेगारी घटनाही घडत असतात. दोन वर्षांपूर्वी गांजाखेत चौक येथील एका सावजी हॉटेलसमोर पार्किंगवरून खासगी कंपनीच्या अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली होती.
काचीपुरा येथील हॉटेल व ढाब्यांवर अवैध दारू विक्री अनेक दिवसांपासून सुरू आहे. सचिन नावाचा कर्मचारी हा ढाबा संचालक व पोलिसांमधील दुवाचे काम करतो. सचिनच्या माध्यमातूनच पोलिसांना खूश ठेवले जाते. सचिन पोलिसांसाठी कमाईचे साधन आहे. त्यामुळे त्याच्या इशाऱ्यावर पोलीस येथील ढाबा व हॉटेलविरुद्ध कारवाई करीत नाही. याची सखोल चौकशी झाल्यास अनेक बाबी उघडकीस येतील.