१७ आणि १८ डिसेंबरला नागपूर-वर्धा मार्गे धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द!

By नरेश डोंगरे | Updated: December 13, 2024 23:30 IST2024-12-13T23:30:00+5:302024-12-13T23:30:19+5:30

दोन दिवस राहणार ब्लॉक : सिंदी रेल्वे स्थानकावर यार्ड रीमॉडेलिंग

Many trains running via Nagpur-Wardha on December 17th and 18th have been cancelled! | १७ आणि १८ डिसेंबरला नागपूर-वर्धा मार्गे धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द!

१७ आणि १८ डिसेंबरला नागपूर-वर्धा मार्गे धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द!

- नरेश डोंगरे

नागपूर : मध्य रेल्वेच्यानागपूर विभागातील नागपूर वर्धा सेक्शनमध्ये असलेल्या सिंदी रेल्वे स्थानकावर लाँगहॉल लूपसह थर्ड आणि फोर्थ लाईनच्या संबंधाने यार्ड रिमॉडेलिंग आणि ईलेक्ट्रीक इंटरलॉकिंग केले जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी १७ आणि १८ डिसेंबरला ब्लॉक करण्यात येणार आहे. परिणामी या मार्गाने धावणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्या परावर्तित मार्गाने चालविल्या जाणार आहे. काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. लांब अंतराच्या अनेक गाड्या उशिरा धावणार आहेत. यामुळे उपरोक्त दोन दिवस लाखो प्रवाशांची गैरसोय होण्याचे संकेत आहेत.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या
गाडी क्रमांक ०१३७३ वर्धा - नागपूर मेमू, गाडी क्रमांक ०१३७४ नागपूर वर्धा मेमू, गाडी क्र . ०१३७१ अमरावती - वर्धा मेमू, ०१३७२ वर्धा-अमरावती मेमू, १११२१ भुसावळ - वर्धा एक्स्प्रेस, १११२२ वर्धा -भुसावळ एक्स्प्रेस, १२११९ अमरावती - अजनी एक्स्प्रेस, १२१२० अजनी-अमरावती एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १२११९ अमरावती - जबलपूर एक्स्प्रेस या सर्व गाड्या १८ डिसेंबरला रद्द करण्यात आल्या आहेत.

शॉर्ट टर्मिनेशन ओरिजिनेशन केलेल्या ट्रेन
गाडी क्रमांक ११०३९ कोल्हापूर - गोंदिया एक्स्प्रेस १७ डिसेंबर रोजी वर्धा रेल्वे स्थानकांवर थांबेल. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक ११०४० गोंदिया कोल्हापूर एक्स्प्रेस १८ डिसेंबरला गोंदिया रेल्वे स्थानकावरून सुटण्याऐवजी वर्धा रेल्वे स्थानकावरून दुपारी ११:५९ वाजता सुटेल.

उशिरा धावणाऱ्या गाड्या
गाडी क्रमांक ०५२९३ मुजफ्फरपूर - सिकंदराबाद एक्स्प्रेस १७ डिसेंबरला आपल्या निर्धारित वेळेत सुटण्याऐवजी १ तास ३५ मिनिटे उशिरा धावेल. १२६२१ चेन्नई नवी दिल्ली एक्स्प्रेस याच दिवशी १.३० तास उशिरा, तर २०८०५ विशाखापट्टनम नवी दिल्ली एक्स्प्रेस तिच्या निर्धारित वेळेपेक्षा १.१५ तास विलंबाने धावेल. १२६२२ नवी दिल्ली चेन्नई एक्स्प्रेस १७ डिसेंबरला १.१० तास विलंबाने, तर १२६९१ बंगळुरू हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस ४५ मिनिटे उशिरा धावेल. १२८१० हावडा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस निर्धारित वेळेपेक्षा ३० मिनिटे, १२७२३ हैदराबाद न्यू दिल्ली एक्स्प्रेस ३० मिनिटे, १८०३० कोलकाता शालीमार एलटीटी एक्स्प्रेस १५ मिनिटे, २२९०६ कोलकाता शालीमार ओखा एक्स्प्रेस १० मिनिटे, १२९७० जयपूर कोईम्बतूर एक्स्प्रेस १० मिनिटे, १२८४३ पूरी अहमदाबाद एक्स्प्रेस १० मिनिटे, २२६७० पाटना एर्नाकुलम एक्स्प्रेस १० मिनिटे, १२५१२ कोचुवेली गोरखपूर एक्स्प्रेस ही गाडी १० मिनिटे, तर ०११३९ नागपूर मडगाव एक्स्प्रेस (१८ डिसेंबरला) १० मिनिटे उशिरा धावेल.

Web Title: Many trains running via Nagpur-Wardha on December 17th and 18th have been cancelled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.