नकाशा शुल्कवाढीचा प्रस्ताव सभागृहाकडे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:17 AM2021-01-08T04:17:50+5:302021-01-08T04:17:50+5:30

केंद्र सरकारकडून दिव्यांग व्यक्ती अधिनियम २०१६ अंतर्गत मनपातर्फे व्यवसायासाठी आर्थिक अनुदान दिले जाते. यासाठी मनपाने समिती गठित केली होती. ...

Map fee increase proposal to the House. | नकाशा शुल्कवाढीचा प्रस्ताव सभागृहाकडे.

नकाशा शुल्कवाढीचा प्रस्ताव सभागृहाकडे.

Next

केंद्र सरकारकडून दिव्यांग व्यक्ती अधिनियम २०१६ अंतर्गत मनपातर्फे व्यवसायासाठी आर्थिक अनुदान दिले जाते. यासाठी मनपाने समिती गठित केली होती. ११८ प्रस्ताव आले होते. यातील १०० मंजूर करण्यात आले. प्रत्येक लाभार्थींला दोन लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. मात्र जिल्हा परिषद वा अन्य विभागाकडून लाभ घेणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. यासाठी नाहरकत प्रमाणपत्र द्यावे लागेल.

.......

१२ उद्यानांच्या नाल्यावर एसटीपी

महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व अभियांत्रिकी विभागातर्फे १२ उद्यानालगतच्या नाल्यावर एसटीपी उभारण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली. यावर १.२१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

या पाण्याचा वापर उद्यानासाठी केला जाणार आहे. यात लक्ष्मीनगर झोनमधील पीएमजी सोसायटी उद्यान नरेंद्रनगर, कर्वेनगर उद्यान वर्धा रोड, धरमपेठ झोनमधील शंकरनगर उद्यान, जय विघ्नहर्ता काॅलनी उद्यान, धंतोली झोनमधील मोक्षधाम घाट उद्यान, नेहरूनगर झोनचे सेनापतीनगर उद्यान, गांधीबाग झोनचे चिटणवीसपुरा उद्यान, तुळसीबाग उद्यान, रतन काॅलनी उद्यान, सतरंजीपुरा झोनचे नाईक तालाब उद्यान तांडापेठ, लकडगंज झोनचे म्हाडा काॅलनी उद्यान, मंगळवारी झोनमधील सखाराम मेश्राम उद्यानाच्या बाजूला एसटीपी उभारला जाणार आहे.

Web Title: Map fee increase proposal to the House.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.