५०० चौ.मीटर क्षेत्रापर्यंतचे नकाशे झोनस्तरावर मंजूर करण्यात यावे  : अभय गोटेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 10:43 PM2019-11-08T22:43:50+5:302019-11-08T22:44:51+5:30

५०० चौ.मीटर क्षेत्रापर्यंत बांधकामाचे नकाशे झोनस्तरावर मंजूर करण्यात यावे, अशी सूचना स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती अभय गोटेकर यांनी दिले.

Maps up to 500 sq m should be sanctioned at zone level: Abhay Gotekar | ५०० चौ.मीटर क्षेत्रापर्यंतचे नकाशे झोनस्तरावर मंजूर करण्यात यावे  : अभय गोटेकर

५०० चौ.मीटर क्षेत्रापर्यंतचे नकाशे झोनस्तरावर मंजूर करण्यात यावे  : अभय गोटेकर

Next
ठळक मुद्देनागपूर महानगरपालिकेच्या स्थापत्य व प्रकल्प समितीची आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ले-आऊटवरील बांधकामासाठी नकाशे मंजूर करण्याकरिता महानगरपालिकेच्या नगररचना विभागाची परवानगी आवश्यक असते. त्यासाठीची विकेंद्रीकरण पद्धती सुरू करण्यासाठी ५०० चौ.मीटर क्षेत्रापर्यंत बांधकामाचे नकाशे झोनस्तरावर मंजूर करण्यात यावे, अशी सूचना स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती अभय गोटेकर यांनी दिले.
शुक्रवारी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात स्थापत्य व प्रकल्प समितीची बैठक आयोजित करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू ) झलके, समिती सदस्य विद्या मडावी, सोनाली कडू, पल्लवी श्यामकुळे, अंसारी सय्यदा बेगम मोहम्मद निजामुद्दीन, उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त महेश धामेचा, कार्यकारी अभियंता अमीन अख्तर, राजेश भूतकर, गिरिश वासनिक, नगररचना विभागाचे उपअभियंता उज्ज्वल धनविजय, नगररचना विभागाचे श्रीकांत देशपांडे, आर.एस.निमजे बाजार अधीक्षक श्रीकांत वैद्य प्रामुख्याने उपस्थित होते.
शहरातील ५७२ अंतर्गत येणाऱ्या ले-आऊटवरील नकाशा बांधकाम नकाशे मंजूर होत नसल्याची तक्रार वारंवार होत होती. याबाबत संबंधित विभागाला विचारणा केली असता २७ ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार शहराच्या नियोजन व व्यवस्थापनाची पूर्ण जबाबदारी ही महापालिकेची असल्याचे नगररचना विभागाचे श्रीकांत देशपाडे यांनी सांगितले. प्रलंबित नकाशे मंजुरीची कामे त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश सभापती अभय गोटेकर यांनी दिले. मनुष्यबळ अपुरे पडत असतील तर त्याबाबत नासुप्रला पत्र देण्यात यावे, असेही अभय गोटेकर यांनी सूचवले.
रेन वॉटर हार्वेस्टिंगबद्दल बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. रेन वॉटर हार्वेस्टिंग आता बंधनकारक करण्यात आलेले आहे. रेन वॉटर हार्वेस्टिगचे प्रमाणपत्र आर्किटेक्ट कडून घेणे आवश्यक आहे. याबाबत सकारात्मतेने काम करण्याचे निर्देश सभापती अभय गोटेकर यांनी दिले.
मनपा मार्फत सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा यावेळी सभापती अभय गोटेकर यांनी घेतला. यामध्ये ऑरेंज स्ट्रीट प्रकल्प, बुधवार बाजार महाल, कमाल टॉकीज जवळील प्रकल्प, महाल गांधीबाग झोन ऑफिस, टाऊन हॉल, मासोळी बाजार, आयसोलेशन हॉस्पीटलचा समावेश आहे. शहरात सुरू असेलेल्या सीमेंट रस्ता टप्पा १,२,३ चा आढावा यावेळी सभापती अभय गोटेकर यांनी घेतला. शहरातील मनपा मालकीच्या खुल्या जागा किती आहे याचा आढावा सभापतींनी यावेळी घेतला. खुल्या जागेवर फलक लावावे, असे निर्देश अभय गोटेकर यांनी दिले.

Web Title: Maps up to 500 sq m should be sanctioned at zone level: Abhay Gotekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.