मराठा बंद, दोन हजार जवान तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 11:30 PM2018-08-08T23:30:18+5:302018-08-08T23:36:05+5:30

मराठा समाजातर्फे गुरुवारी पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी सुरक्षेचा तगडा बंदोबस्त केला आहे. शहरात अधिकाऱ्यांसह २ हजार जवानांना रस्त्यावर तैनात करण्यात आले आहे. त्यांच्या मदतीसाठी १०० स्ट्रायकिंग फोर्स आणि क्वीक रिस्पॉन्स टीमसुद्धा तैनात ठेवण्यात आली आहे. बंददरम्यान कुठली परिस्थिती हाताळण्याच्या उद्देशाने शहरात सर्वत्र सुरक्षेचे जाळे पसरविलेले आहे.

Maratha Bandh, two thousand soldiers deployed | मराठा बंद, दोन हजार जवान तैनात

मराठा बंद, दोन हजार जवान तैनात

Next
ठळक मुद्देपोलिसांचा तगडा बंदोबस्तकुठल्याही स्थितीचा सामना करण्यास जवान तैनात१०० स्ट्रायकिंग फोर्सशहरभरात सुरक्षेचे जाळे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मराठा समाजातर्फे गुरुवारी पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी सुरक्षेचा तगडा बंदोबस्त केला आहे. शहरात अधिकाऱ्यांसह २ हजार जवानांना रस्त्यावर तैनात करण्यात आले आहे. त्यांच्या मदतीसाठी १०० स्ट्रायकिंग फोर्स आणि क्वीक रिस्पॉन्स टीमसुद्धा तैनात ठेवण्यात आली आहे. बंददरम्यान कुठली परिस्थिती हाताळण्याच्या उद्देशाने शहरात सर्वत्र सुरक्षेचे जाळे पसरविलेले आहे.
मराठाआंदोलनादरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी बंदला मराठा समाजाने प्रतिष्ठेचा मुद्दा बनविलेला आहे. मुख्यमंत्री हे नागपूरचे असल्याने पोलिसांसाठी ही परीक्षेची वेळ आहे. पोलीस आयुक्त डॉ. बी.के. उपाध्याय आणि सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम हे रुजू झाल्यापासून त्यांचा नागपुरातील हा पहिलाच बंदोबस्त असेल. पोलीस आयुक्त दोन दिवसांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी शहरात मॉक ड्रीलही करण्यात आली.
पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी २५० अधिकारी आणि १७५० पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात केले आहे. यात १५०० पुरुष आणि २५० महिला कर्मचारी आहेत. शहरातील प्रत्येक भागात पोलीस तैनात राहतील. संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण भागातील सुरक्षिततेत अतिरिक्त सावधगिरी बाळगली जाईल. कोतवाली, गणेशपेठ, सक्करदरा, नंदनवन, हुडकेश्वर, सोनेगाव, प्रतापनगर आदी पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची स्थिती निर्माण झाल्यास त्याला नियंत्रणात आणण्यासाठी १०० स्ट्रायकिंग फोर्स बनवण्यात आली आहे. ते शहरात फिरत गस्त लावतील. उपायुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच विशेष पथके तयार राहतील. काही पथके नियंत्रण कक्षात रिझर्व्ह ठेवण्यात येईल. सर्व अधिकाऱ्यांना सकाळपासूनच आपल्या परिसरात गस्त घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कुठलीही अप्रिय घटनेची शक्यता दिसताच तात्काळ वरिष्ठांना सूचित करण्यास सांगितले आहे.
वाहतूक पोलिसांचीही वेगळी व्यवस्था केली आहे. महत्त्वपूर्ण चौकांसह रस्त्यांवरही पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. वाहतूक पोलीस अधिकारीही शहरात गस्त घालतील. असे सांगितले जाते की, मराठा समाजातील प्रमुख नागरिक गुरुवारी सकाळी महाल गांधी गेट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आंदोलनाची सुरुवात करतील. यानंतर रॅली किंवा समूहाद्वारे शहरात फिरण्याची शक्यता आहे. पोलिसांना असा संशय आहे की, आंदोलनकर्ते प्रमुख बाजारांना बंद करण्यासह वाहतूक व्यवस्थेलाही हानी पोहचवू शकतात. रस्त्यांवर आंदोलन करून वाहतूक प्रभावित करू शकतात. वाहनांचे टायर जाळणे किंवा लहानसहान दगडफेक करून तणाव निर्माण केला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी व्यूहरचना आखली आहे. बुधवारी सायंकाळी पोलीस आयुक्त डॉ. बी.के. उपाध्याय आणि सहआयुक्त रवींद्र कदम यांनी वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

गोंधळ घालणाऱ्यांवर नजर
पोलीस बंददरम्यान गोंधळ घालणाऱ्यांवर बारीक नजर ठेवून राहतील. ते काही लोकांवर लक्ष ठेवूनही आहेत. काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके काही दिवसांपासून आंदोलनादरम्यान खूप सक्रिय होते. ते निवडणूक प्रचारासाठी मध्य प्रदेशात असल्याची माहिती आहे.

 

Web Title: Maratha Bandh, two thousand soldiers deployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.