रामटेक येथे मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:10 AM2021-03-01T04:10:29+5:302021-03-01T04:10:29+5:30
रामटेक : मराठी भाषा दिनानिमित्त रामटेक शहरातील श्री नरेंद्र तिडके कला व वाणिज्य महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. ...
रामटेक : मराठी भाषा दिनानिमित्त रामटेक शहरातील श्री नरेंद्र तिडके कला व वाणिज्य महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात अतिथींनी वेबिनारद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संगीता टक्कामोरे होत्या. प्रा. नरेश आंबिलकर यांनी कुसुमाग्रजांची कविता सादर करून कार्यक्रमाला सुरुवात केली. मराठी ही जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा असून, समृद्ध भाषा असल्याचे प्रतिपादन प्रा. जयश्री सातोकर यांनी केले. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानाच्या माध्यमातून जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना म्हटली. अनेक संतांनी मराठी भाषा समृद्ध केली. या भाषेचा वारसा सर्वांनी जपावा, असे आवाहन त्यांनी केले. संचाल प्रा. नरेश आंबिलकर यांनी केले. प्रा. डॉ. श्रीकांत भोवते यांनी आभार मानले. याप्रसंगी प्रा. अमरीश ठाकरे, प्रा. स्वप्नील मनघे यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले हाेते.