मॅरेथॉनमध्ये शुभम, राजश्री, नंदू, गीता विजेते

By Admin | Published: April 15, 2017 02:22 AM2017-04-15T02:22:50+5:302017-04-15T02:22:50+5:30

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीदिनी आयोजित मॅरेथॉन दौड स्पर्धेत शुभम मेश्राम, राजश्री पद्मगीरवार,

The marathons include Shubham, Rajshree, Nandu, Geeta winners | मॅरेथॉनमध्ये शुभम, राजश्री, नंदू, गीता विजेते

मॅरेथॉनमध्ये शुभम, राजश्री, नंदू, गीता विजेते

googlenewsNext

नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीदिनी आयोजित मॅरेथॉन दौड स्पर्धेत शुभम मेश्राम, राजश्री पद्मगीरवार,नंदू भुजाडे आणि गीता चाचेरकर यांनी विजेतेपदाचा मान मिळविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मॅरेथॉन दौड समितीतर्फे नागपूर जिल्हा अ‍ॅथ्लेटिक्स संघटनेच्या सहकार्याने संविधान चौक ते दीक्षाभूमी असे आयोजन करण्यात आले.
खुल्या गटात पुरुषांची ११ किमी दौड शुभम मेश्रामने ३५ मिनिटे ४५.०५ सेकंदात जिंकली. शेषराज राऊत दुसऱ्या तर विक्की राऊत तिसऱ्या स्थानी राहिला. महिलांची ८ किमी दौड राजश्री पद्मगीरवारने २८ मिनिटे ३२.४५ सेकंदात पूर्ण करीत अव्वल स्थान मिळविले. प्रणाली बोरेकर दुसऱ्या आणि कोमल ढबाले तिसऱ्या स्थानी आली. १८ वर्षांखालील मुलांच्या ८ किमी दौडमध्ये नंदू भुजाडे २७ मिनिटे ३५.१५ सेकंदांसह अव्वल आला.
रोहित झा व अभय गोरे दुसऱ्या तसेच तिसऱ्या स्थानी राहिले. मुलींची ४ किमी दौड गीता चाचेरकरने १७ मिनिटे ३५.५३ सेकंदात पूर्ण केली. दिव्या नखाते व खुशी बुधकोंडावार यांना दुसऱ्या तसेच तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. स्पर्धेला आ. डॉ. मिलिंद माने यांनी हिरवा झेंडा दाखविला.
दीक्षाभूमी येथे पुरस्कार वितरण सोहळ्याला समितीचे अध्यक्ष यशवंत तेलंग, योगेश ठाकरे, जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे सचिव डॉ. शरद सूर्यवंशी, गुरुदेव नगराळे, रवींंद्र टोंग, डॉ. विवेकानंद सिंग, बंटीप्रसाद यादव, राम वाणी, अर्चना कोट्टेवार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते चारही गटातील पहिल्या दहा स्थानावरील धावपटूंना पुरस्कार प्रदान करण्यात आले. (क्रीडा प्रतिनिधी)

निकाल :
पुरुष (११ किलोमीटर) : शुभम मेश्राम ३५ मि.४५.०५ सेकंद, शेषराज राऊत ३७:२०.१२ (दोन्ही नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ), विक्की राऊत ३८:१२.१५ (नागपूर सिटी अ‍ॅथ्लेटिक्स क्लब), कमलेश रंगारी (नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ), नीलेश हटवार (ट्रॅक स्टार अ‍ॅथलेटिक्स क्लब), भास्कर अतकरे (प्रो-हेल्थ फाऊंडेशन), नंदकिशोर आकार (एस.बी. सिटी कॉलेज), सूरज तिवारी (ट्रॅक स्टार अ‍ॅथ्लेटिक्स क्लब), नीतेश बिसेन (नागपूर सिटी अ‍ॅथ्लेटिक्स क्लब), निशांत रामटेके (विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ). महिला ( ८ किलोमीटर) : राजश्री पद्मगीरवार २८ मि. ३२.४५ से. (नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ), प्रणाली बोरेकर २९:२०.१५ (ट्रॅक स्टार अ‍ॅथ्लेटिक्स क्लब), कोमल ढबाले ३०:१५.४५ (रॉयल रनर्स क्लब), शारदा भोयर (नागपूर सिटी अ‍ॅथ्लेटिक्स क्लब), अनिता भलावी (ट्रॅक स्टार अ‍ॅथ्लेटिक्स क्लब), अंशू राऊत, नेहा चौधरी (दोन्ही विद्याथी युवक क्रीडा मंडळ), साक्षी डोंगरे (मानवता हायस्कूल).
४१८ वर्षांखालील मुले (८ किलोमीटर) : नंदू भुजाडे २७ मि. ३५.१५ से. (नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ), रोहित झा २८:३०.१८,अभय गोरे २९:१२.२५ (दोन्ही प्रो-हेल्थ फाऊंडेशन), प्रणय मोरघडे, प्रफुल्ल निकम (दोन्ही विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ), अभिषेक ढोमणे (नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ), अमन गुप्ता, वैभव सुपटकर, प्रतीक बारापात्रे (ज्योती फिटनेस अकादमी), पवन मोरघडे (विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ). मुली (४ किलोमीटर) : गीता चाचेरकर, १७ मि. ३५.५३ से., दिव्या नखाते १७:४०.२० (दोन्ही विश्वव्यापी विद्यालय, वेलतूर), साक्षी बुधकोंडावार १८:२०.४५, आस्था निंबार्ते, मानसी निंबार्ते, निधी तरारे (सर्व विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ), तन्वी मेंढे, मीना देवराई, दिव्यानी डोंगे, मोना डायरे (सर्व ज्योती फिटनेस क्लब).

 

Web Title: The marathons include Shubham, Rajshree, Nandu, Geeta winners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.