मरावे परी देहरुपी उरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 01:51 AM2017-08-30T01:51:19+5:302017-08-30T01:51:35+5:30

तुमचे अवयवदान ठरू शकते इतरांच्या आयुष्यातील आशेचा किरण, अवयव दान एक महादान, मरावे परी देहरुपी उरावे...

Marave Angel Deharupi Uravay | मरावे परी देहरुपी उरावे

मरावे परी देहरुपी उरावे

Next
ठळक मुद्दे भरपावसात महाअवयवदान रॅली : तीन हजारावर डॉक्टर, परिचारिका, विद्यार्थ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तुमचे अवयवदान ठरू शकते इतरांच्या आयुष्यातील आशेचा किरण, अवयव दान एक महादान, मरावे परी देहरुपी उरावे... अशी विविध घोषवाक्य देत भरपावसात निघालेल्या ‘महाअवयव दान’ रॅलीने मंगळवारी सकाळी शहरवासीयांचे लक्ष वेधले. वैद्यकीय शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित अवयवदान जनजागृती महोत्सवानिमित्त या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये तीन हजारावर डॉक्टर, परिचारिका, विद्यार्थी व कर्मचाºयांचा समावेश होता.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) पुढाकाराने आयोजित या रॅलीला महापौर नंदा जिचकार यांनी हिरवी झेंडी दाखवली. यावेळी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. के. आर. सोनपुरे उपस्थित होते. मेडिकलच्या क्रीडांगण येथून निघालेली ही रॅली राष्टÑसंत तुकडोजी महाराज चौक, क्रीडा चौक, मेडिकल चौक मार्गक्रमण करीत मेडिकलच्या क्रीडांगणावर पोहचली. येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. पाऊस सुरू असतानाही शिस्तबद्ध पद्धतीने रॅली निघाली. विशेषत: रॅलीमध्ये विद्यार्थ्यांसोबतच बहुसंख्य वरिष्ठ डॉक्टरांची उपस्थिती होती. या रॅलीमध्ये मेडिकल महाविद्यालयासोबतच, शासकीय दंत महाविद्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो), धनवटे नॅशनल महाविद्यालय, डॉ. आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी, शिवाजी विज्ञान महाविद्यालय व मेडिकलच्या एनसीसी विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांच्या नेतृत्वात निघालेल्या रॅलीमध्ये उपअधिष्ठाता डॉ. दिनकर कुंभलकर, डॉ. सुधीर गुप्ता, डॉ. राज गजभिये, डॉ. रमेश पराते, डॉ. अशोक मदान, डॉ. नरेंद्र तिरपुडे, डॉ. उदय नार्लावार, डॉ. सी.एम. बोकडे, डॉ. समीर गोलावार, डॉ. गणेश डाखळे, डॉ. श्रीखंडे आदी उपस्थित होते. रॅलीच्या आयोजनासोबतच इतर विविध स्पर्धा व माहितीपर कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी डॉ. उदय नार्लावार यांच्या मार्गदर्शनात महाअवयवदान कोआॅर्डिनेटर डॉ. अविनाश गावंडे, डॉ. बागडे, डॉ. वाधवा, डॉ. पाटील, डॉ. लांजेवार, डॉ. मेश्राम, डॉ. जोगुलवार यांच्यासह पीएसएम विभागाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.

Web Title: Marave Angel Deharupi Uravay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.