विवाहितेचा विनयभंग, आराेपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:08 AM2021-06-02T04:08:12+5:302021-06-02T04:08:12+5:30

खापरखेडा : घरातील बाथरूममध्ये मुलासाेबत अंघाेळ करीत असलेल्या विवाहित महिलेचा आराेपीने विनयभंग केला. शिवाय, आराेपीने पीडित महिला व तिच्या ...

Marital molestation, arrest of Arapees | विवाहितेचा विनयभंग, आराेपीस अटक

विवाहितेचा विनयभंग, आराेपीस अटक

Next

खापरखेडा : घरातील बाथरूममध्ये मुलासाेबत अंघाेळ करीत असलेल्या विवाहित महिलेचा आराेपीने विनयभंग केला. शिवाय, आराेपीने पीडित महिला व तिच्या पतीला पाहून घेण्याची धमकी दिली. दरम्यान, पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यास अटक केली आहे. ही घटना खापरखेडा येथे साेमवारी (दि.३१) सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.

मनाेज लखन आदेवार (२८, रा. वाॅर्ड क्र. २, खापरखेडा) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. ३० वर्षीय पीडित महिला ही आपल्या दाेनवर्षीय मुलासाेबत घरातील बाथरूममध्ये अंघाेळ करीत असताना, आराेपीने बाथरूमच्या खिडकीतून वाकून पाहून तिचा विनयभंग केला. पीडित महिला व तिच्या पतीने आराेपीस हटकले असता, त्याने त्यांच्याशी वाद घालत पाहून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून खापरखेडा पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि कलम ३५४ (अ), ५०६, सहकलम ३(१), डब्ल्यू (प)(पप), ३(२)(५)(अ) अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ कायद्यान्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीस अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पाेलीस अधिकारी मुख्तार बागवान करीत आहेत.

Web Title: Marital molestation, arrest of Arapees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.