बाजार समितीत काेराेना प्रतिबंधक लसीकरण, चाचणी कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:09 AM2021-05-18T04:09:21+5:302021-05-18T04:09:21+5:30

कुही : मांढळ (ता. कुही) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. येथे येणाऱ्या ...

Market Committee Carina Prevention Vaccination, Testing Program | बाजार समितीत काेराेना प्रतिबंधक लसीकरण, चाचणी कार्यक्रम

बाजार समितीत काेराेना प्रतिबंधक लसीकरण, चाचणी कार्यक्रम

Next

कुही : मांढळ (ता. कुही) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. येथे येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बाजार समिती व्यवस्थापनाने मंगळवारी (दि. १८) काेराेना चाचणी व प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाचे आयाेजन केले आहे.

लाॅकडाऊनमुळे मध्यंतरी या बाजार समितीतील सर्व व्यवहार काही दिवस बंद हाेते. शेतकऱ्यांची आर्थिक अडचण व खरीप हंगाम विचारात घेता, हे व्यवहार पुन्हा सुरू करण्यात आले. त्यामुळे मार्केट यार्डमध्ये वर्दळ वाढली आहे. काेराेना संक्रमणाचा संभाव्य धाेका लक्षात घेता शेतकरी, अडते, व्यापारी, हमाल, मापारी, ताेलारी व इतरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मंगळवारी काेराेना चाचणी व प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम आयाेजित केला असल्याची माहिती बाजार समिती व्यवस्थापनाने दिली. याचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्तीने आधार कार्ड व माेबाइल नंबर साेबत आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती मनोज तितरमारे, उपसभापती महादेव जीभकाटे, सचिव अंकुश झंझाळ, संचालक हरीश कढव, नामदेव बुराडे, गुणाकार सेलोकर यांनी केले आहे.

Web Title: Market Committee Carina Prevention Vaccination, Testing Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.