गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठ फुलली, कोरोनाला निमंत्रण? ..... जोड .....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:12 AM2021-09-10T04:12:12+5:302021-09-10T04:12:12+5:30
गणेशोत्सवात पूजेची फुले महाग झाली आहेत. गुरुवारी सीताबर्डी येथील होलसेल बाजारात शेवंती ८० रुपये किलो, झेंडू ६० ते ७०, ...
गणेशोत्सवात पूजेची फुले महाग झाली आहेत. गुरुवारी सीताबर्डी येथील होलसेल बाजारात शेवंती ८० रुपये किलो, झेंडू ६० ते ७०, देशी गुलाब २०० ते २५० रुपये आणि निशिगंधा ३५० ते ४०० रुपये, डिव्हाईन गुलाब ३०० रुपये, गिलायडिया ५० ते ६० रुपये किलो दराने विक्री झाली. शुक्रवारी गणेश स्थापनेचा दिवस असल्याने लोकांची जास्त मागणी राहील. त्यामुळे फुले महाग होणार असल्याची शक्यता फूल मार्केट असोसिएशनचे जयंत रणनवरे यांनी व्यक्त केली. पूजेसह सजावटीची फुलेही महाग आहेत. ग्लाडिओलस ६० रुपये डझन, डच गुलाब १५० ते १८० रुपये (२० नग), कार्नेशन २५० ते ३०० रुपये (२० नग), जरबेरा ५० ते ६० रुपये (१० नग), लिली एक हजार रुपये (१० नग) अशी किंमत आहे. गेल्या तीन दिवसापासून पावसामुळे फुले ओली असल्याने जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे दुपारच्या सत्रात भाव कमी होतो. पण कोरड्या फुलांना जास्त भाव मिळतो. शुक्रवारी आवकीवर भाव ठरणार आहे.