नागपूर पोलीस आयुक्तांकडून बाजारपेठेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 09:19 PM2020-09-14T21:19:51+5:302020-09-14T21:22:12+5:30

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सोमवारी सीताबर्डी, इतवारी बाजारपेठेसह विविध भागात फिरून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.

Market inspection by Nagpur Police Commissioner | नागपूर पोलीस आयुक्तांकडून बाजारपेठेची पाहणी

नागपूर पोलीस आयुक्तांकडून बाजारपेठेची पाहणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सोमवारी सीताबर्डी, इतवारी बाजारपेठेसह विविध भागात फिरून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
राजधानीत उद्रेक व्हावा तसा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तरीसुद्धा अनेक जण बाजारपेठेत गर्दी करत आहेत. त्यामुळे दररोज बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक दुकानात सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. हे लक्षात घेऊन बाजारपेठांचा आढावा घेण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजतापासून सीताबर्डी, कॉटन मार्केट, गणेशपेठ, गांधीबाग, इतवारी परिसरातील बाजारपेठेची पाहणी केली. तेथील व्यापाऱ्यांशी चर्चा करून त्यांना खबरदारीच्या उपाययोजनाची अंमलबजावणी करण्याची सूचना केली. व्यापाºयांसोबत चर्चा करून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचेही त्यांनी आवाहन केले.
ज्या दुकानदारांकडून खबरदारी घेतली जात नाही, जेथे पाचपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती दिसेल, अशा दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश त्या भागातील पोलिसांना दिले. त्यानुसार शहरातील अनेक दुकानदारांवर पोलिसांनी सोमवारी दंडात्मक कारवाई केली. यावेळी आयुक्तांसोबत प्रभारी सहपोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त विक्रम साळी तसेच त्या त्या भागातील पोलीस उपायुक्त सोबत होते.

Web Title: Market inspection by Nagpur Police Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.