मार्केटिंग कंपन्यांच्या मुसक्या आवळणार

By admin | Published: July 20, 2015 03:09 AM2015-07-20T03:09:15+5:302015-07-20T03:09:15+5:30

पॉलिहाऊ स, शेडनेट व औषधी वनस्पती शेतीच्या नावाखाली विदर्भातील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या मार्केटिंग कंपन्यांविरु फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल,

Marketing companies will be happy | मार्केटिंग कंपन्यांच्या मुसक्या आवळणार

मार्केटिंग कंपन्यांच्या मुसक्या आवळणार

Next

दणका लोकमतचा
नागपूर : पॉलिहाऊ स, शेडनेट व औषधी वनस्पती शेतीच्या नावाखाली विदर्भातील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या मार्केटिंग कंपन्यांविरु फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, अशा आश्वासनासह कृषी राज्यमंत्री राम शिंदे यांनी विधान परिषदेत संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीचे निर्देश दिले आहेत. यासंबंधी भाजपा सदस्या शोभाताई फडणवीस यांनी हा प्रश्न उपस्थित करू न त्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. विशेष म्हणजे, सर्वप्रथम ‘लोकमत’ने गत ३० जून रोजी ‘शेतीवर आधुनिक दरोडा’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करू न या प्रश्नाला वाचा फोडली होती.
विदर्भातील शेतकरी अगोदरच अतिवृष्टी, दुष्काळ व नापिकीच्या चक्रव्यूहात फसला आहे. असे असताना काही मार्केटिंग कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या भोळेभाबडेपणाचा गैरफायदा घेऊ न, त्यांची लाखो रुपयांनी फसवणूक केली आहे. या कंपन्यांमध्ये नागपुरातील पर्णनेत्र मार्केटिंग कंपनी, नोबल एक्स्प्लोकेम लिमिटेड, बायोनिक्स कंपनी व जळगाव येथील दिशा ग्रीन हाऊ सेस कंपनीचा समावेश आहे. या संबंधित कंपन्यांनी पॉलिहाऊ स, शेडनेट व औषधी वनस्पती शेतीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी बँकांकडे गहाण करू न, त्यावर मिळालेले लाखो रुपयांचे कर्ज स्वत: हडप केल्याचा आरोप आहे. या सर्व कंपन्या शेतकऱ्यांना पॉलिहाऊ स, शेडनेट किंवा औषधी वनस्पती शेतीचे प्रोजेक्ट तयार करण्यासाठी कन्सल्टंट म्हणून काम करतात.

Web Title: Marketing companies will be happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.