बाजारपेठा एक दिवसाआड खुल्या ठेवाव्यात : व्यापाऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 11:27 PM2020-06-16T23:27:41+5:302020-06-16T23:29:50+5:30

अनलॉक-१ मध्ये ग्राहक खरेदीसाठी बाजारात येत आहेत. पण आॅड-इव्हन फॉर्म्युल्यामुळे त्यांना खरेदीला त्रास होत आहे. ग्राहकांच्या संख्यावाढीसाठी दुकानदारांतर्फे सोशल मीडियाच्या माध्यमातून संग्रहित डेटातून मॅसेज पाठविले जात आहेत. नागपुरातील बाजारपेठा एक दिवसाआड सुरू ठेवण्यास ग्राहकांना खरेदीची सोय होणार आहे. मनपा आयुक्तांनी दुकानदारांच्या मागणीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केली.

Markets should be kept open for a day: Demand from traders | बाजारपेठा एक दिवसाआड खुल्या ठेवाव्यात : व्यापाऱ्यांची मागणी

बाजारपेठा एक दिवसाआड खुल्या ठेवाव्यात : व्यापाऱ्यांची मागणी

Next
ठळक मुद्देग्राहक मोठ्या संख्येने बाजारात येणार, आयुक्तांनी निर्णय घ्यावा

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : अनलॉक-१ मध्ये ग्राहक खरेदीसाठी बाजारात येत आहेत. पण आॅड-इव्हन फॉर्म्युल्यामुळे त्यांना खरेदीला त्रास होत आहे. ग्राहकांच्या संख्यावाढीसाठी दुकानदारांतर्फे सोशल मीडियाच्या माध्यमातून संग्रहित डेटातून मॅसेज पाठविले जात आहेत. नागपुरातील बाजारपेठा एक दिवसाआड सुरू ठेवण्यास ग्राहकांना खरेदीची सोय होणार आहे. मनपा आयुक्तांनी दुकानदारांच्या मागणीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केली.
गांधीबाग होलसेल क्लॉथ मार्केटचे अधक्ष अजय मदान म्हणाले, या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. गर्दी टाळण्यासाठी मनपा आयुक्तांनी ऑड-इव्हन फॉर्म्युला दिशेनुसार अवलंबला. पण त्यानंतरही बाजारात गर्दी होत असून त्यावर नियंत्रण नाही. ग्राहकांना पूर्णवेळ आणि आवडीनुसार खरेदी करू देण्यासाठी प्रत्येक बाजारपेठा एक दिवसाआड सुरू ठेवाव्यात. त्यामुळे ग्राहक एखाद्या वस्तूच्या खरेदीसाठी घराबाहेर पडल्यास त्याला आवडीनुसार मनसोक्त खरेदी करता येईल. ऑड-इव्हन फॉर्म्युल्यात ग्राहकाच्या आवडीचे दुकान बंद असेल तर तो अन्य दुकानातून खरेदी करून मोकळा होतो. त्यामुळे संबंधित दुकानदाराला आार्थिक नुकसान होत आहे. प्रशासनाच्या निर्णयामुळे अनेकांना व्यवसायावर पाणी सोडावे लागत आहे.
गांधीबाग होलसेल क्लॉथ बाजारात विदर्भातील अन्य जिल्हे आणि तालुक्यातील किरकोळ व्यापारी खरेदीसाठी येतात. त्यांनाही दिवस निवडून आणि पासेस बनवून खरेदीसाठी नागपुरात यावे लागते. तसे पाहता अन्य जिल्हे आणि तालुकास्तरावर बाजारपेठा दरदिवशी खुल्या आहेत. पण ग्राहकांच्या आवडीनिवडी जपणे त्यांना होलसेलमध्ये खरेदीअभावी कठीण झाले आहे. या सर्व बाबींचा विचार करून मनपा आयुक्तांनी बाजारपेठा सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, असे मदान म्हणाले.
बाजारपेठा अडीच महिने बंद होत्या. त्यामुळे व्यापाºयांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. बाजार सुरू झाल्यानंतर ग्राहकांनी खरेदीसाठी यावे म्हणून दुकानदारांकडे असलेल्या डेटाचा वापर मेसेजच्या स्वरूपात करीत आहे. सध्या ग्राहक कमी असले तरीही पुढे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर निघतील, असा विश्वास मदान यांनी व्यक्त केला.

Web Title: Markets should be kept open for a day: Demand from traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.