गुणपत्रिकांचा ‘लेझर’ लोच्या!

By admin | Published: July 1, 2016 02:56 AM2016-07-01T02:56:28+5:302016-07-01T02:56:28+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांच्या निकालांचा वेग वाढला आहे.

Marks 'Laser'! | गुणपत्रिकांचा ‘लेझर’ लोच्या!

गुणपत्रिकांचा ‘लेझर’ लोच्या!

Next

नागपूर विद्यापीठ : तीन आठवड्यांपासून विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांच्या निकालांचा वेग वाढला आहे. परंतु निकालांची गती वाढली असली तरी अनेक विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिकेची प्रतीक्षाच आहे. निकाल लागून तीन आठवडे उलटले तरी अनेक अभ्यासक्रमांच्या गुणपत्रिका अद्याप तयार झालेल्या नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘लेझर’ पद्धतीने गुणपत्रिका छापण्यास विलंब होत आहे. त्यामुळे गुणपत्रिका प्रलंबित आहेत.
नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे ४५० हून अधिक निकाल जाहीर झाले आहेत. यात अंतिम वर्षांच्या निकालांचादेखील समावेश आहे. या विद्यार्थ्यांसाठी मूळ गुणपत्रिका फार महत्त्वाची असते परंतु अनेक विद्यार्थ्यांच्या हाती अद्याप गुणपत्रिका लागलेल्याच नाही.
विद्यार्थी रोज महाविद्यालये व परीक्षा भवनच्या पायऱ्या झिजवत आहेत. महाविद्यालयांकडून विद्यापीठाकडे बोट दाखविण्यात येत आहे, परंतु विद्यार्थ्यांना तेथेदेखील ठोस उत्तर देण्यात येत नाही.
याबाबत प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांना विचारणा केली असता त्यांनी परीक्षा नियंत्रक डॉ.नीरज खटी यांच्याकडून माहिती घेतली. विद्यापीठाने ‘लेझर प्रिंटर’वर गुणपत्रिका छापण्याचे ठरविले होते. परंतु या प्रणालीत एक एक गुणपत्रिका ‘प्रिंट’ होते. त्यामुळे सगळ्या गुणपत्रिकांच्या ‘प्रिंटींग’ला विलंब होत आहे. ही बाब लक्षात घेऊन आता पारंपरिक पद्धतीनेच ‘प्रिंिटंग’ करण्यात येत आहे. अनेक अभ्यासक्रमांच्या गुणपत्रिका तयार झाल्या असून त्या आठवडाभरात महाविद्यालयांकडे पाठविण्यात येतील, अशी डॉ.येवले यांनी माहिती दिली. (प्रतिनिधी)

विद्यार्थ्यांसोबत महाविद्यालयेही हैराण
हिवाळी परीक्षांच्या गुणपत्रिका अजून का मिळाल्या नाहीत याबद्दल विद्यार्थी महाविद्यालयांकडे विचारणा करताना दिसून येत आहेत. महाविद्यालयांकडून परीक्षा विभागात चौकशी करण्यात येते. परंतु त्यांना कुठलेही ठोस उत्तर देण्यात येत नाही. परीक्षा विभागात सातत्याने चकरा मारून महाविद्यालयीन कर्मचारीदेखील हैराण झाले आहेत.

Web Title: Marks 'Laser'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.