प्रेमाची भूरळ, लग्नही केले.. महिनाभरानंतर जे समोर आलं त्याने तिच्या पायाखालची वाळूच सरकली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 04:42 PM2023-01-19T16:42:09+5:302023-01-19T16:45:10+5:30

जिम ट्रेनरविरुद्ध गुन्हा दाखल

Marriage to young woman claiming to be unmarried, case registered against gym trainer | प्रेमाची भूरळ, लग्नही केले.. महिनाभरानंतर जे समोर आलं त्याने तिच्या पायाखालची वाळूच सरकली

प्रेमाची भूरळ, लग्नही केले.. महिनाभरानंतर जे समोर आलं त्याने तिच्या पायाखालची वाळूच सरकली

googlenewsNext

नागपूर : ती जिममध्ये कसरतीसाठी यायची, तो तिथे ट्रेनर म्हणून काम करतो. दरम्यान त्यांची ओळखी वाढली. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात होऊन त्यांनी लग्नही केले. पण महिनाभरात असं काही समोर आलं की तिने थेट पोलिस ठाणे गाठले. युवतीने दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी जिम ट्रेनरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रविकांत अशोक धार्मिक (वय ३४, केडीके कॉलेज रोड, नंदनवन) असे आरोपीचे नाव आहे. रविकांत जिम ट्रेनर आहे. २९ वर्षीय युवती त्याच्या जिममध्ये येत होती. दरम्यान, दोघांमध्ये मैत्री झाली. युवतीच्या तक्रारीनुसार रविकांतने सुरुवातीला तिला आपण अविवाहित असल्याचे सांगून मैत्री केली. दोघांमध्ये गाठीभेटी होऊ लागल्या. त्यानंतर आरोपी रविकांतने लग्न करण्याचे आमीष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

युवतीने दबाव टाकल्यानंतर त्याने सीताबर्डीत एका मंडळात तिच्याशी लग्न केले. त्यानंतर तो पतीप्रमाणे तिच्यासोबत राहू लागला. मात्र, काही दिवसांतच रविकांत विवाहित असून, त्याला एक मुलगा असल्याची माहिती युवतीला कळली. याबाबत विचारणा केली असता रविकांतने युवतीला तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवतीने हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Marriage to young woman claiming to be unmarried, case registered against gym trainer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.