अपघातात दाम्पत्य ठार

By admin | Published: March 31, 2016 03:17 AM2016-03-31T03:17:47+5:302016-03-31T03:17:47+5:30

परस्पर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींची जोरदार धडक बसली. दरम्यान, मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जखमींना चिरडले.

Married couple in an accident | अपघातात दाम्पत्य ठार

अपघातात दाम्पत्य ठार

Next

दुचाकी एकमेकांवर धडकल्या : डोरली परिसरातील घटना
कळमेश्वर : परस्पर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींची जोरदार धडक बसली. दरम्यान, मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जखमींना चिरडले. अशा विचित्र अपघाताच्या घटनेत पती-पत्नी जागीच ठार झाले तर बहीण गंभीर जखमी झाली. ही घटना नागपूर -काटोल मार्गावरील डोरली (भिंगारे) गावालगतच्या आयएमटी कॉलेजजवळ बुधवारी दुपारी ४.१५ वाजताच्या सुमारास घडली.
हेमराज सुधाकर ठाकरे (३५, रा. थाटुरवाडा, ता. काटोल) व त्यांची पत्नी कविता हेमराज ठाकरे (३१) अशी मृत दाम्पत्याचे नाव असून संगीता शशिकांत सुके (रा. कळमेश्वर) असे जखमी तरुणीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हेमराज ठाकरे हे पत्नी कवितासह एमएच-४०/झेड-५७७१ क्रमांकाच्या दुचाकीने लहान भावाच्या लग्नानिमित्त नागपूरला खरेदीसाठी निघाले होते. दरम्यान, नागपूरहून परत येताना त्यांनी कळमेश्वर येथील नातेवाईक शशिकांत सुके यांच्या घरी भेट दिली होती.त्यानंतर सायंकाळच्या सुमारास हेमराज यांनी बहीण संगीताला सोबत घेऊन तिघेही थाटूरवाड्याला जात होते.
दरम्यान, डोरली परिसरातील आयएमटी कॉलेजवळ काटोलकडून कळमेश्वरकडे येणाऱ्या एमएच-४०/एडब्ल्यू-२३४८ क्रमांकाच्या दुचाकीची समोरासमोर जबर धडक बसली. यात तिघेही खाली पडले. अशातच मागून येणाऱ्या भरधाव वाहनाने जखमींना चिरडले. यात हेमराज व त्याची पत्नी कविताचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर बहीण संगीता सुके ही गंभीररीत्या जखमी झाली.
अपघाताची माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी संगीतावर ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर तिला नागपूरला हलविण्यात आले. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. अपघातातील दुसऱ्या दुचाकीचालकाचा शोध लागला नाही. या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून अज्ञात वाहनचालकाचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास ठाणेदार प्रमोद मडामे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Married couple in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.