शहीद नायक भूषण सतई यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 06:00 AM2020-11-16T06:00:00+5:302020-11-16T06:00:05+5:30

Nagpur News Martyr Nayak Bhushan Satai जम्मू-काश्मीर राज्यातील गुरेज सेक्टरमध्ये भारतीय सेनेत कार्यरत शहीद नायक भूषण रमेश सतई यांचे पार्थिव सोमवार, १६ रोजी सकाळी ८ वाजता काटोल येथील निवासस्थानी येणार असून अंत्ययात्रा सकाळी १० वाजता शहीद भूषण यांच्या श्रीकृष्णनगर, फैलपुरा निवासस्थानाहून निघणार आहे.

Martyr Nayak Bhushan Satai's body was cremated today | शहीद नायक भूषण सतई यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार 

शहीद नायक भूषण सतई यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : काटोल तालुक्यातील सर्वांचे शिरोमणी ठरलेले आणि जम्मू-काश्मीर राज्यातील गुरेज सेक्टरमध्ये भारतीय सेनेत कार्यरत नायक भूषण रमेश सतई हे पाकिस्तानकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झाले. त्यांचे पार्थिव सोमवार, १६ रोजी सकाळी ८ वाजता काटोल येथील निवासस्थानी येणार असून अंत्ययात्रा सकाळी १० वाजता शहीद भूषण यांच्या श्रीकृष्णनगर, फैलपुरा निवासस्थानाहून निघणार आहे.

अंत्ययात्रा नगरभव, जैन मंदिर चौक, स्टेट बँक चौक, रुईया हायस्कूल चौक, गर्ल्स होस्टेल, गुरांचा दवाखाना, गळपुरा, दोडकीपुरा, आंबेडकर चौक, हुतात्मा स्मारक, पोलीस स्टेशन, अंबालाल पटेल बिल्डिंग, सरस्वती महाद्वार चौक, बस स्टॅण्ड, रेस्ट हाऊस, धवड पेट्रोल पंप, यादव पेट्रोल पंप या मार्गाने दहनस्थळावर जाणार आहे. अंत्ययात्रा घरासमोरून जाईल तेव्हा पुष्पवृष्टी करावी आणि कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे सांगण्यात आले आहे.

Read in English

Web Title: Martyr Nayak Bhushan Satai's body was cremated today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Martyrशहीद