कोविडवर मात करण्यासाठी मास्क,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:07 AM2021-04-10T04:07:39+5:302021-04-10T04:07:39+5:30
- डॉ. अशोक अरबट : संपूर्ण भारतात कोरोनाची लाट नागपूर : भारतात कोरोनाची लाट असून, सहा महिन्यात कोरोना रुग्णाने ...
- डॉ. अशोक अरबट : संपूर्ण भारतात कोरोनाची लाट
नागपूर : भारतात कोरोनाची लाट असून, सहा महिन्यात कोरोना रुग्णाने उच्चांक गाठला आहे. कोविड-१९चा पहिला रुग्ण भारतात केरळ राज्यात ३० जानेवारी २०२० ला आढळून आला होता. नागपुरात पहिला रुग्ण ११ मार्चला, तर पहिला मृत्यू कर्नाटक राज्यात १० मार्च २०२० ला झाला होता. त्यामुळेच भारतात २३ मार्च २०२० रोजी ७६ दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आल्याची माहिती क्रीम्स हॉस्पिटल, नागपूरचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष, वरिष्ठ पल्मोनोलॉजिस्ट डॉ. अशोक अरबट यांनी दिली.
कोविड - १९वर मात करायची असेल तर मास्क घालणे, दूरस्थ अंतर कायम ठेवणे व सॅनिटायझेशन, अधिक टेस्टिंग, लवकर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, जोमदार हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आणि लसीकरण हे महत्त्वाचे असल्याचे डॉ. अरबट यांनी सांगितले.
कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२० महिन्यात वाढली होती. पण, महत्त्वपूर्ण उपाययोजनांनी रुग्णांची संख्या जानेवारी २०२१ महिन्यापर्यंत कमी झाली होती. लसीकरणाची सुरुवात पहिल्यांदा ६० वरील वयोगट आणि ५० वरील वयोगटासाठी १६ जानेवारी २०२१ ला सुरू झाली. त्यानंतर भारतात १ एप्रिलला लसीकरण मोहीम ४५ वर्षांवरील लोकांसाठी सुरू करण्यात आली. या दरम्यान भारतात सर्वाधिक केसेसची नोंद मुख्यत्वे महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपुरात झाली. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात कठोर निर्बंध लादले.
भारतात कोविड का वाढत आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. केसेस वाढीची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत. गर्दीत बेजबाबदार वागणूक, विषाणूबाबत शासनाची कमी झालेली जनजागरण व नोंदणी मोहीम, तसेच निर्बंधांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर महामारीचा परिणाम झाला. लसीकरणामुळे संरक्षण होत असल्याच्या भावनेने लोक अधिक शिथिल झाले. लोकांमध्ये चांगल्या प्रतिकारशक्तीची वाट पाहात आहोत. अधिक संसर्ग आणि सर्वाधिक लसीकरणाने चांगल्या प्रतिकारशक्तीचे लक्ष्य पूर्ण होणार आहे. देशाच्या अन्य भागांच्या तुलनेत महाराष्ट्रात संसर्ग जास्त (२० वर) आहे. त्यामुळे एप्रिल महिना आपले राज्य आणि नागपूरसाठी जास्त निर्णायक ठरणार आहे. (वा.प्र.)