१२९ नागरिकांना दंड करून दिले मास्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:08 AM2020-12-24T04:08:28+5:302020-12-24T04:08:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी बुधवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १२९ नागरिकांविरुद्ध कारवाई ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी बुधवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १२९ नागरिकांविरुद्ध कारवाई करून ६४ हजार ५०० रुपयाचा दंड वसूल केला. या सर्वांना मास्क देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी २४,९८८ नागरिकांविरुद्ध कारवाई करून १ कोटी ८ लाख ५३ हजाराचा दंड वसूल केला आहे.
पथकाद्वारे लक्ष्मीनगर झोनअंतर्गत १४, धरमपेठ २१, हनुमाननगर ११, धंतोली १०, नेहरूनगर १८, गांधीबाग ७, सतरंजीपुरा ११, लकडगंज ८, आशीनगर १४, मंगळवारी १२ आणि मनपा मुख्यालयातील ३ जणांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात आतापर्यंत ५०० रुपये याप्रमाणे १९,५१८ बेजबाबदार नागरिकांकडून ९७ लाख ५९ हजार वसूल करण्यात आले.