नागपुरातील शांतीनगर भागात शेजा-यात जोरदार हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 04:22 PM2018-07-09T16:22:21+5:302018-07-09T16:23:12+5:30

शेजा-यांमध्ये क्षुल्लक कारणावरून जोरदार हाणामारी झाली. परिणामी दोन्ही गटातील चार जणांना दुखापत झाली असून, दोन्हीकडून परस्पर विरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्यामुळे शांतीनगर पोलिसांनी १६ जणांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले.

Massive clashes into neighbours at Shantinagar area of ​​Nagpur | नागपुरातील शांतीनगर भागात शेजा-यात जोरदार हाणामारी

नागपुरातील शांतीनगर भागात शेजा-यात जोरदार हाणामारी

Next
ठळक मुद्देक्षुल्लक कारणावरून वाद : १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेजा-यांमध्ये क्षुल्लक कारणावरून जोरदार हाणामारी झाली. परिणामी दोन्ही गटातील चार जणांना दुखापत झाली असून, दोन्हीकडून परस्पर विरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्यामुळे शांतीनगर पोलिसांनी १६ जणांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले.
शांतीनगरातील मेश्राम दारू भट्टीच्या मागे यशवंत डोमाजी निखारे (वय ५८) आणि अशोक हरि बावणे (वय ३३) आजुबाजुला राहतात. घराच्या बाजुला टाकलेल्या रेती आणि स्लॅबच्या मलब्यामुळे या दोन परिवारात रविवारी रात्री ७ वाजता भांडण सुरू झाले. ते विकोपाला गेले आणि दोन्ही गटातील मंडळींनी एकमेकांना बेदम चोप दिला. त्यानंतर शांतीनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी निखारे यांच्या तक्रारीवरून अशोक हरि बावणे, विजू गुणवंत बावणे, हरी पूजाराम बावणे लिलाबाई बावणे, पुष्पा बावणे, संगीता बावणे, रजनी बावणे, राजू बावणे, येणू बावणे आणि लता महादेव वाघाडे या दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
तर अशोक हरी बावणे यांच्या तक्रारीवरून प्रतिभा निखारे, यशवंत निखारे, श्वेता निखारे, पूजा निखारे, वैशाली निखारे आणि निकिता निखारे या सहा जणाविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.

 

 

Web Title: Massive clashes into neighbours at Shantinagar area of ​​Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.