Nagpur Latest News : नागपुरात अग्नितांडव; २० ते २५ सिलिंडरच्या स्फोटाने महाकालीनगर परिसर हादरला; शंभरावर झोपड्या खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2022 11:45 AM2022-05-09T11:45:05+5:302022-05-09T18:25:59+5:30

Massive Fire Breaks out at Mahakali Nagar slum in Nagpur: या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी आगीमुळे शेकडो लोकांचा संसार उघड्यावर पडला, त्यामुळे परिसरात आक्रोशाचे चित्र होते.

massive fire breaks out at Mahakali Nagar slum in Nagpur | Nagpur Latest News : नागपुरात अग्नितांडव; २० ते २५ सिलिंडरच्या स्फोटाने महाकालीनगर परिसर हादरला; शंभरावर झोपड्या खाक

Nagpur Latest News : नागपुरात अग्नितांडव; २० ते २५ सिलिंडरच्या स्फोटाने महाकालीनगर परिसर हादरला; शंभरावर झोपड्या खाक

googlenewsNext

नागपूर :  Nagpur News :- येथील बेलतरोडी परिसरातील महाकाली नगर Mahakali Nagar slum झोपडपट्टीला आज(दि. ९) सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. यात जवळपास शंभर झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली. Fire Breaks out at Mahakali Nagar slum in Nagpur २० ते २५ गॅस सिलिंडर्सचे स्फोट झाल्याने  परिसरातील नागरिक दहशतीत होते. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी आगीमुळे शेकडो लोकांचा संसार उघड्यावर पडला, त्यामुळे परिसरात आक्रोशाचे चित्र होते.

सकाळी १० वाजेच्या सुमारास अचानक मोठा स्फोटाचा आवाज झाला व त्यानंतर झोपड्यांमध्ये आग लागली. झोपडपट्टी मोठी असून, झोपड्या आजूबाजूला लागून असल्याने आग वेगाने पसरली. अग्निशमन दलाचे पथक पोहोचण्याअगोदरच शंभराहून अधिक झोपड्या आगीच्या विळख्यात सापडल्या होत्या. नागरिकांनी घरातील सामान बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आग पसरत असताना काही झोपड्यांमधील सिलिंडर्सचा स्फोट झाला. त्यामुळे ज्वाळा आणखी तीव्र झाल्या. काही किलोमीटर अंतरावरूनदेखील आग दिसून येत होती. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, तसेच पोलिसांनीदेखील धाव घेतली. अरुंद गल्ल्या असल्याने मदतकार्याला वेळ लागला. सुमारे अडीच तासानंतर आग विझवण्यात यश आले.

यामुळे पसरली आग

झोपडपट्टीच्या पूर्व भागात आग लागली. एलपीजी सिलिंडर, वारा, तापमान आणि झोपडीच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारे लाकूड, बांबू, प्लॅस्टिकचे पत्रे, कापड आदीमुळे आग वेगाने पसरली. अग्निशमन विभागाच्या ११ गाड्या व टँकरच्या मदतीने आग विझविण्यात आली. आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

वार्तांकन करणाऱ्या कॅमेरामॅनवर हल्ला

दरम्यान, आगीचे वार्तांकन करणाऱ्या प्रादेशिक वृत्तवाहिनीच्या चमूवर काही स्थानिक तरुणांनी हल्ला केला. यात कॅमेरामन अतुल हिरडे जखमी झाले. त्यांचा कॅमेरा हिसकविण्याचादेखील प्रयत्न झाला. इतरही काही पत्रकारांशी गैरव्यवहार करण्यात आला.

पालकमंत्र्यांची भेट

आगीचे वृत्त समजतात बेलतरोडी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याशिवाय पालकमंत्री नितीन राऊत यांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आगीची माहिती कळताच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनीदेखील गर्दी केली होती. बघ्यांमुळे मदतकार्यात बरेच अडथळेदेखील येत होते.

Web Title: massive fire breaks out at Mahakali Nagar slum in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.