३५ कोटींच्या फसवणूकीचा सूत्रधार अटकेत; दोन वर्षांपासून होता फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2022 10:11 PM2022-10-11T22:11:37+5:302022-10-11T22:12:40+5:30

Nagpur News गुंतवणूकीच्या रकमेच्या दुप्पट परतावा देण्याचा दावा करत ३५ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटच्या सूत्रधाराला नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

Mastermind of 35 crore fraud arrested; He was on the run for two years | ३५ कोटींच्या फसवणूकीचा सूत्रधार अटकेत; दोन वर्षांपासून होता फरार

३५ कोटींच्या फसवणूकीचा सूत्रधार अटकेत; दोन वर्षांपासून होता फरार

Next
ठळक मुद्दे देशभरात फसवणुकीचे जाळेआर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

 

नागपूर : गुंतवणूकीच्या रकमेच्या दुप्पट परतावा देण्याचा दावा करत ३५ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटच्या सूत्रधाराला नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. सुशील कोल्हे असे आरोपीचे नाव असून मागील दोन वर्षांपासून तो फरार होता. त्याने एजीएम कार्पोरेशन, एजीएम डिजीटल लिमीटेड, जनसेवा म्युचुअल बेनिफीट निधी व इतर शेल कंपन्या स्थापन करून त्यामाध्यमातून फसवणूक केली होती. त्याच्या अटकेने या प्रकरणातील इतर लोकांचीही नावे समोर येऊ शकतात.

सुशील कोल्हे याने त्याचा भाऊ पंकज, भागीदार भरत शंकर साहू आणि इतरांच्या मदतीने सिव्हिल लाइन्समध्ये एजीएम कॉर्पोरेशन, एजीएम डिजिटल लि., जनसेवा म्युचुअल बेनिफीट निधी या कंपन्या सुरू केल्या. कोल्हे बंधू डिजिटल मार्केटिंगमध्ये भरपूर नफा असल्याचे सांगून गुंतवणुकीची माहिती देत असत. तथाकथित योजनांवर १८ महिन्यांत गुंतवणुकीच्या दुप्पट, मूळ रकमेच्या अडीच टक्के आणि ४० महिन्यांपर्यंत अडीच टक्के परतावा आणि बोनस मिळेल असा दावा करायचे. पॉश हॉटेल्समध्ये सेमिनार घेऊन लोकांना आकर्षक भेटवस्तू द्यायचे. त्यामुळे लोक गुंतवणूक करू लागले. सुरुवातीला आरोपींनी लोकांना वेळेवर नफा दिला. त्यामुळे त्याचे रॅकेट देशातील अनेक राज्यात पसरले. शेजारील राज्यातून लोक मोठ्या संख्येने येऊ लागले. काही वेळाने कोल्हे बंधूंनी पैसे परत करण्यास विलंब सुरू केला. पोलिस खात्यात मध्यस्थ म्हणून कार्यरत असलेल्या एका तरुणाचे कोल्हे बंधूंशी संबंध होते. पीडित तरुणांनी आर्थिक शाखेकडे तक्रार केली असता गुन्हा दाखल करण्यात तरुणाने अडथळे निर्माण केले. याचदरम्यान सुशीलने कार्यालय बंद करून भाऊ आणि साथीदारांसह पळ काढला. त्यानंतर नागेंद्रसिंग ठाकूर यांच्या आर्थिक शाखेने कोल्हे बंधूंविरुद्ध फसवणूक आणि एमपीआयडी अंतर्गत गुन्हा दाखल केला.

फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता

गेल्या दोन वर्षांत अनेक वेळा पीडित महिलांनी कोल्हे बंधूंबाबत पोलिसांना माहिती दिली, मात्र ते काहीच करू शकले नाहीत. कोल्हे बंधूंच्या रॅकेटमध्ये अडकलेल्या नागरिकांनी आर्थिक शाखेकडे तक्रार करण्याचे आवाहन आर्थिक शाखेने केले आहे. पीडितांनी तपास अधिकारी मुकुंद कवाडे यांच्याशी संपर्क साधावा. कवाडे यांच्याशी सातत्याने संपर्क साधला असता त्यांनी मोबाईलवर प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, फसवणूकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Mastermind of 35 crore fraud arrested; He was on the run for two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.