मस्तवाल गुंडांचा डीजेवाल्यांवर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:07 AM2020-12-23T04:07:08+5:302020-12-23T04:07:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रिसेप्शनमध्ये डीजेच्या तालावर नाचताना गोंधळ घालण्यास विरोध केला म्हणून दोन गुंडांनी डीजे वाजविणाऱ्या दोघांवर ...

Mastwal goons stab DJs | मस्तवाल गुंडांचा डीजेवाल्यांवर चाकूहल्ला

मस्तवाल गुंडांचा डीजेवाल्यांवर चाकूहल्ला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : रिसेप्शनमध्ये डीजेच्या तालावर नाचताना गोंधळ घालण्यास विरोध केला म्हणून दोन गुंडांनी डीजे वाजविणाऱ्या दोघांवर चाकूने प्राणघातक हल्ला चढवला. यात मयूर वसंतराव हेडावू आणि विकास विनायक बोरीकर हे दोघे गंभीर जखमी झाले. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बगडगंज कॉर्पोरेशन शाळेजवळ सोमवारी रात्री ९.४५ च्या सुमारास ही घटना घडली. राहुल रंगारी आणि ऋषभ मेंढे अशी आरोपींची नावे आहेत.

शुभम विनोद वाघमारे यांच्या लग्नाचे रिसेप्शन नंदनवनमधील जय बजरंग नगरातील शाळेत ठेवण्यात आले होते. सोमवारी रात्री स्वागत समारंभासोबतच कार्यक्रमातील मंडळी डीजेवर नृत्य करीत असताना आरोपी राहुल आणि ऋषभ पाहुण्यांमध्ये शिरून डान्सच्या नावाखाली वेडेवाकडे अंगविक्षेप करू लागले. त्यामुळे महिला, मुली तेथून बाजूला झाल्या. आरोपी सैराट होऊन गोंधळ घालत असल्याचे पाहून डीजेचा जॉकी मयूर आणि विकासने त्यांना समजावून सांगितले. ते ऐकत नसल्याचे पाहून डीजे बंद केला. ते डीजे काढत असल्याचे पाहून आरोपी राहुल आणि ऋषभने अश्लील शिवीगाळ करून त्यांना धमकावणे सुरू केले. एवढेच नव्हे तर मयूरच्या पोटावर आणि विकासच्या छातीवर चाकूचे घाव घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे पाहुण्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली. काही जणांनी हिंमत दाखविल्याने आरोपी धमकी देत पळू लागले. यश प्रेम कुहीकर (वय २१) या तरुणाने नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. आरोपींची चौकशी सुरू आहे.

----

आरोपी सराईत गुन्हेगार

आरोपी राहुल आणि ऋषभ हे दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे समजते.

---

Web Title: Mastwal goons stab DJs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.