मौदा-सुंदरगाव मार्ग खड्डेमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:10 AM2021-03-26T04:10:36+5:302021-03-26T04:10:36+5:30
मौदा : मौदा-सुंदरगाव-चारभा मार्ग हा तालुक्यातील वर्दळीचा मार्ग आहे. दुरुस्तीअभावी या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. जड वाहतुकीमुळे या ...
मौदा : मौदा-सुंदरगाव-चारभा मार्ग हा तालुक्यातील वर्दळीचा मार्ग आहे. दुरुस्तीअभावी या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. जड वाहतुकीमुळे या रस्त्याची दुरवस्था होत आहे. या खड्ड्यामुळे अपघातासोबतच वाहन खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
मौदा तालुक्यातील लापका, धामणगाव, मांगली (तेली), सुंदरगाव, चारभा अशा अनेक गावांना जोडणारा हा मार्ग आहे. या मार्गावरील डांबर पूर्णपणे उखडले आहे. गिट्टी वाहनांच्या चाकामुळे उडत असल्याने रस्त्यालगत उभ्या व्यक्तीला इजा होण्याची शक्यता बळावली आहे. पाऊस येताच या रस्त्यावर डबकी साचतात. रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रस्त्यावरील खड्डे व्यवस्थित दिसत नसल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. या मार्गावरून शेतमालाची वाहतूक केली जात असल्याने शेतकऱ्यानांही त्रास सहन करावा लागतो.