माऊली म्हणाले निवृत्तीनाथांना, मी समाधी घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 01:12 AM2019-01-12T01:12:07+5:302019-01-12T01:19:58+5:30
भावार्थदीपिका लिहिल्यानंतर ज्ञानदेवांना भगवंतांच्या कृपेची अनुभूती झाली़. इतके मोठे कार्य भगवंतांच्या आशीवार्दाशिवाय अशक्य आहे. भगवंताने ते कार्य माझ्याकडून करवून घेतले़ आता आणखी काय राहिले़़़ भगवंत कृपेची एवढी मोठी अनुभूती झाल्यानंतर आता समाधिस्त व्हावे, असा मानस मनाशी धरत ज्येष्ठ बंधू आणि गुरू निवृत्तीनाथांना त्याची माहिती दिली आणि निवृत्तीनाथ जरा थबकलेच़़ संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन रंगवताना मालवण येथील हभप हरिहरबुवा नातू यांनी ज्ञानदेवांच्या कार्याची माहिती प्रतिपादित केली़
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भावार्थदीपिका लिहिल्यानंतर ज्ञानदेवांना भगवंतांच्या कृपेची अनुभूती झाली़. इतके मोठे कार्य भगवंतांच्या आशीवार्दाशिवाय अशक्य आहे. भगवंताने ते कार्य माझ्याकडून करवून घेतले़ आता आणखी काय राहिले़ भगवंत कृपेची एवढी मोठी अनुभूती झाल्यानंतर आता समाधिस्त व्हावे, असा मानस मनाशी धरत ज्येष्ठ बंधू आणि गुरू निवृत्तीनाथांना त्याची माहिती दिली आणि निवृत्तीनाथ जरा थबकलेच़़ संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन रंगवताना मालवण येथील हभप हरिहरबुवा नातू यांनी ज्ञानदेवांच्या कार्याची माहिती प्रतिपादित केली़
राधा गोविंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने महाल, चिटणीस पार्क स्टेडियमवरील मुकुंदराज महाराज साधू कीर्तन परिसरात आयोजित राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी हरिहरबुवा नातू यांचे कीर्तन झाले़ प्रमुख पाहुणे म्हणून शिवकथाकार विजयराव देशमुख उपाख्य सद्गुरूदास महाराज, साई मंदिर नागपूरचे संस्थापक विजयबाबा कोंड्रा, आ़ विकास कुंभारे, उद्योजक विलास काळे, भारत विकास परिषद विदर्भचे अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता उपस्थित होते़ रूपाली बक्षी यांनी गीत सादर केले़
नातू म्हणाले़, मनातील देवाच्या अनुष्ठानासह अनुसंधान बांधण्याची गरज असून, ज्ञानेश्वरांनी २७ अभंगांचा हरिपाठ लिहिला आणि प्रत्येक अभंगात नामस्मरणाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. परमेश्वराशी अनुसंधान जोडले तर कर्तव्यबुद्धी जागृत होते़ त्यातून कृतज्ञता भाव येतो आणि समर्पण वृत्ती वाढते़ समर्पण झाले की कृतार्थता येते़ याचे महत्त्व संतांनी सांगितले आहे. निवेदन स्मिता खनगई यांनी केले़ भगतबुवांना मृदंगमवर श्रीधर कोरडे, तबल्यावर हर्ष पायघन, संवादिनीवर धनराज यावलकर, सतारवर नासीर खान आणि व्हायोलिनवर शिरीष भालेराव यांनी साथसंगत केली.