माउली, तूच माझा पाठीराखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:08 AM2021-05-09T04:08:36+5:302021-05-09T04:08:36+5:30

गर्भ अवतरणापासून ते तुझ्या जन्मापर्यंत आणि नंतर स्वत:च्या मृत्यूपर्यंत सतत तुझाच विचार करते ती आई. स्वत:च्या वेदना, स्वत:च्या आकांक्षांना ...

Mauli, you are my supporter | माउली, तूच माझा पाठीराखा

माउली, तूच माझा पाठीराखा

Next

गर्भ अवतरणापासून ते तुझ्या जन्मापर्यंत आणि नंतर स्वत:च्या मृत्यूपर्यंत सतत तुझाच विचार करते ती आई. स्वत:च्या वेदना, स्वत:च्या आकांक्षांना मूठमाती घालते ती आई. कृत्रिम असो, आभासी असो वा नैसर्गिक उन्ह, वारा, पावसात तुझं कवच बनून सारा वार सहन करते आणि जखमा सोसते ती आई. वर्तमानातील वेदनेच्या खाचखळग्यात तुझ्या भविष्यवेधी सुखासाठी भगवंतांशी भांडते, प्रार्थना करते ती आई. तू पोटभर जेवावा म्हणून स्वत:चं पान रिकामे ठेवते, तू पडू नये म्हणून स्वत: आधार म्हणून उभी राहते, ती माउली भगवंतच नव्हे का... चराचरात पाहिलेला भगवंत या माउलीच्याच अधिन असलेला बघितला आहे. पुढे सायकल चालविताना निर्भय असणारा हा मुलगा त्याच्या पाठीशी असलेल्या आईमुळेच होय. माउलीच त्याच्या पाठीशी असताना चिंता कशाची...

छायाचित्र : राजेश टिकले

...............

Web Title: Mauli, you are my supporter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.